mahur palkhi. 
मराठवाडा

माहूर गडावर श्री दत्तजन्म सोहळा

बालाजी कोंडे

माहूर (जिल्हा नांदेड) : माहूर गडावरिल श्री दत्तशिखर संस्थान हे देशात प्रसिद्ध आहे. गडावरिल श्री दत्तजन्म सोहळा पाहण्यासाठी व भगवान दत्त प्रभुंच्या दर्शनाकरिता लाखो भाविक या उत्सवात येतात. बुधवारी (ता.११) सकाळी अकरा वाजता संस्थान येथे दत्तजन्म सोहळा विधीस सुरवात होणार आहे, अशी माहीती श्री दत्तशिखर संस्थानचे व्यवस्थापक अॅड. एस.पी. देशमुख यांनी दिली आहे.


माहूर गडावरिल श्री दत्तजयंती सोहळा भारतात प्रसिद्ध आहे. प्रशासन गेल्या एक महिन्यापासून उत्सवाच्या तयारीत लागले आहेत. तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर यांनी सर्व विभागप्रमुखांची दोन वेळा बैठक घेऊन उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. श्री दत्त शिखर संस्थान येथे मुख्य दत्तजन्म सोहळा होणार असल्याने संस्थानने जय्यत तयारी केली आहे. संस्थानचे विश्वस्त गणेशराव पाटील, विश्वस्त विश्वासराव माने, विश्वस्त अॅड. आशिषभाऊ देशमुख, विश्वस्त अॅड. निलेश पावडे, विश्वस्त धनंजय महाजन, विश्वस्त गोपालभारती हे उत्सव यशस्वीतेकरिता प्रयत्न करित आहेत.

भाविकांना श्री दत्तजन्म सोहळा पाहण्यासाठी एलईडी स्क्रिन


भाविकांना श्री दत्तजन्म सोहळा पाहण्यासाठी एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनाकरिता दर्शनबारी तयार करण्यात आली आहे. भाविकांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेकरिता संस्थानने विससुरक्षा कर्मचार, ४५ स्वयंसेवकाची नियुक्ती केली आहे. अशी माहीती श्री दत्तशिखर संस्थानचे व्यवस्थापक अॅड. एस.पी.देशमुख यांनी दिली आहे.

तगडा पोलिस बंदोबस्त ः


माहूर गडावरिल श्री दत्त शिखर संस्थानच्या मुख्यमंदीरात बुधवारी (ता.११) सकाळी अकरा वाजता गडाचे महंत श्री मधुसुधनजी भारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री दत्तजन्म सोहळा होणार आहे. या वेळी भजनी मंडळ भजन सादर करतील त्यानंतर विधीवत दत्तजन्म सोहळा साजरा करण्यात येणार आहे. माहूर गडावर श्री दत्त शिखर संस्थान, श्री देवदेवेश्वर संस्थान, श्री साईनाथ महाराज वसमतकर मठ यांच्यासह अनेक छोट्या, मोठ्या मठात, मंदीरात श्री दत्तजयंती उत्सव साजरा होणार आहे. लाखो दत्तभक्त येथे येणार असल्याने पोलीसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस निरिक्षक ः चार, पोलिस उपनिरिक्षक ः ११, पोलिस कर्मचारी ः १२०, महिला पोलिस कर्मचारी ः २०, वाहतूक पोलिस ः आठ, असा पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी किनवट मंदार नाईक यांच्या मार्गदर्शनात बंदोबस्त लावण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासन सज्ज


श्री दत्तजयंती उत्सवाकरिता महसुल, आरोग्य, राज्य परिवहन महामंडळ, नगरपंचायत,महावितरण, वनविभाग, यांच्यासह सर्व यंत्रणा सज्ज झाली असून भाविकांनी उत्सवाचा मनोभावे आनंद घ्यावा असे आवाहन तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर यांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेचं बांगलादेशला गिफ्ट, भारतासमोर नवं संकट; वस्त्रोद्योगाला बसू शकतो फटका

T20 World Cup: पाकिस्तानी गोलंदाजाच्या मदतीला R Ashwin! टीका करणाऱ्या भारतीय खेळाडूलाच झापलं

Amravati Crime : चार महिने पाच जणांकडून अत्याचार; शाळकरी मुलगी राहिली गर्भवती, दोघे आरोपी अल्पवयीन

Gold Rate Today : सोनं-चांदीचे भाव घसरले! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

Kolhapur Traffic : कोल्हापुरात ट्रॅफिकचा स्फोट! ‘मास्टर प्लॅन’ कागदावरच राहणार का, की महापालिका घेणार ठोस निर्णय?

SCROLL FOR NEXT