file photo 
मराठवाडा

श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड ऍण्ड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : श्री गुरु गोबिंदसिंघजी यांच्या प्रकाशपर्वाला समर्पीत ४७ व्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड ऍण्ड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट या राष्ट्रीयस्तराच्या स्पर्धेचे आयोजन ता. २७ डिसेंबर ते ता. दोन जानेवारी २०२० दरम्यान करण्यात आले आहे. दुष्टदमन क्रीड़ा व युवक मंडळाच्या वतीने या स्पर्धेत देशातील १६ नामवंत राष्ट्रीय हॉकी संघ सहभागी होणार अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक सरदार गुरमीत सिंघ नवाब (डिम्पल) यांनी येथे दिली.

या स्पर्धेचे उदघाटन गुरुद्वाराचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, गुरुद्वारा लंगर साहेबचे संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, गुरुद्वारा माता साहेबचे जत्थेदार बाबा तेजासिंघजी, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा, सहायक अधीक्षक रणजीतसिंघ चिरागीया यांच्या उपस्थितीत होणार आहे.


पवित्र सचखंड भूमितील स्पर्धा

श्री गुरू गोबिंदसिंघजी यांच्या पवित्र पावन सान्निध्यात वर्ष १९७२ पासून नांदेड शहरात हॉकी स्पर्धा अविरतपणे सुरु आहे. गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड नांदेड, गुरुद्वारा लंगर साहेब, गुरुद्वारा नानकझिरा साहिब बिदर (कर्नाटक) आणि सेवाभावी लोकांच्या सहकार्यातून राष्ट्रीयस्तराची स्पर्धा नांदेड मध्ये घेण्यात येते. देशातील नामवंत खेळाडू येथे येऊन आपले प्रदर्शन करतात आणि त्यांना जवळून पाहण्याची संधी नांदेडकरांना मिळत असते. हॉकी इंडियाच्या नियमाप्रमाणे आणि राष्ट्रीय स्पर्धेचे सर्व मानांकन प्रमाणे स्पर्धा खेळविली जाईल. 

खालसाचे मैदान सज्ज

गुरुमित सिंग नवाब पुढे म्हणाले की, या स्पर्धांच्या आयोजनासाठी शिरोमणी दुष्ट दमन क्रीडा युवक मंडळ आयोजन समितीतील सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच सल्लागार तीन महिन्यापासून तयारीला करीत असून खालसा हायस्कूल बाफना येथील मिनी स्टेडियम सज्ज करण्यात आले आहे. हे सामने पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येते. 

स्पर्धेमुळे नांदेडचे नाव देशपातळीवर 

या स्पर्धा मागील अनेक वर्षापासून नांदेडात सुरू आहेत. सुरवातीला वजिराबाद परिसरातील मल्टीपर्पज मैदानावर या स्पर्धा खेळविल्या जात होत्या. परंतु दिवसेंदिवस या  स्पर्धेला चांगला खेळाडूंचा प्रतिसाद मिळत गेल्याने तेथील जागा कमी पडून लागली. त्यानंतर संयोजकांने सचखंड गुरूद्वाराच्या परवानगीने त्यांच्या मालकीच्या असलेल्या खालसा हायस्कुल मैदानावर ह्या स्पर्धा खेळविल्या जात आहे. त्यामुळे स्पर्धकांचा प्रतिसाद वाढत आहे. ह्या स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर पोहचल्या असून देशातील अनेक दिग्गज खेळाडू या हॉकी स्पर्धेत सहभागी होत आहेत.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलीस चौकीसमोरच गोळीबार, तीन राऊंड फायर, एक जण जखमी

Crime News: पहिल्या पतीचं निधन, दुसऱ्यानं सोडलं; नंतर पत्नीनं तिसऱ्या नवऱ्याला जिवंत जाळून संपवलं, धक्कादायक कारण समोर

Vaibhav Sooryavanshi : वैभवने विश्वविक्रमानंतर 'A' अक्षर का दाखवले? जाणून घ्या सेलिब्रेशनमागची हृदयस्पर्शी गोष्ट

Pune Crime: पुण्यात पोलीस चौकीसमोरच तरुणावर झाडल्या गोळ्या, धक्कादायक घटनेने शहरात खळबळ; नेमंक काय घडलं?

SCROLL FOR NEXT