Shut Down Against CAA In Ausa, Nilanga, Jalkot, Shirur Anantpal  
मराठवाडा

औसा, निलंगा, जळकोट, शिरुरमध्ये कडकडीत बंद

जलील पठाण

लातूर ः जिल्ह्यात चाकूर, निलंगा, औसा, जळकोट, जानवळ, नळेगाव, शिरुर अनंतपाळ येथे नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरित्व नोंदणी कायद्यांविरोधात शुक्रवारी (ता.24) कडकडीत, तर उदगीर शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडी व इतर संघटनांनी सदरील कायद्यांविरोधात राज्यात बंदची हाक दिली होती.


औसा : नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्या विरोधात शुक्रवारी औसा शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत असून सकाळपासूनच औषधी दुकाने, बॅंका व दवाखाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद आहेत. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थीच नसल्याने या ठिकाणीही अघोषित बंदच दिसून येत आहे.
वंचित आघाडी व अन्य संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा चांगला परिणाम औसा शहरात शुक्रवारी दिसून आला. गुरुवारी दुपारपासूनच शहरातील व्यापाऱ्यांना ध्वनिक्षेपकावरून शुक्रवारच्या बंदची माहिती दिली जात होती.

सर्वांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंदच ठेवली होती. सकाळी अकरा वाजता शहरातून एक आवाहन फेरी काढण्यात आली. यामध्ये जी प्रतिष्ठाने सुरू होती ती बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. दुपारी शुक्रवारच्या नमाजनंतर येथील नगरपालिकेच्या सांस्कृतिक सभागृहाच्या मैदानावर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी लोक एकत्र येणार असल्याचे समजते.

या ठिकाणी शाहीन बागच्या धर्तीवर साखळी पद्धतीने आंदोलन करण्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचेही समजत आहे. या बंद दरम्यान कुठेही अनुचित आणि अप्रिय घटना घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. भादा आणि किल्लारी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या उजनी, किल्लारी आदी भागात पोलीस गस्ती वाढवण्यात अली आहे. अद्यापपर्यंत बंद शांततेत सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

कधीकधी भीती वाटते... 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीने घेतलाय लग्नाचा निर्णय; कारण सांगत म्हणाली- आई-बाबा बीडला...

Mumbai Police Arrest 25 Bangladeshis : मुंबई पोलिसांनी सापळा रचून २५ बांगलादेशींना केली अटक ; बनावट कागदपत्रेही जप्त

SCROLL FOR NEXT