vavavi.jpg 
मराठवाडा

मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार तरी कोण?

साजिद खान


वाई बाजार, (ता.माहूर, जि. नांदेड) ः येथील जुन्या बस स्थानकाजवळ रविवारी (ता. १९) सिंदखेड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक यांनी अनधिकृतरीत्या वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले होते. गुन्हा दाखल करणे कामी सिंदखेड पोलिस ठाण्याला घेऊन जात असताना ट्रॅक्टर चालकाने वाळू रस्त्यात फेकून पोबारा केला होता. या घटनेबद्दल परिसरात पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने शेवटी मंगळवारी (ता. २१) अज्ञात चोरट्यांविरुद्ध दोन ब्रास वाळूसह ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.


वाळू तस्करीचा गोरखधंदा
माहूर तालुक्यात वाळू तस्करीचा गोरखधंदा हिंदी चित्रपटांमधील माफिया कंपनीच्या कथानकाला शोभेल असा रंजक आहे. कारण कार्यवाही करण्याची नैतिक जबाबदारी असलेल्या यंत्रनेचाच सौदा होत असल्याने मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार तरी कोण? अशी परिस्थिती आहे. (ता.१९) एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास सिंदखेड पोलिसांच्या पोलिस उपनिरीक्षकांना मोठ्या शिताफीने अनधिकृतरीत्या वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले होते. कार्यवाही करण्यासाठी पोलिस ठाण्याला घेऊन जात असताना रस्त्यात वाळू फेकून या ट्रॅक्टर चालकांनी पोबारा केला होता. ट्रॅक्टर चालक फरार झाल्याचे निमित्त करून पोलिसही नामानिराळे झाले होते. ट्रॅक्टर पकडण्याचे छायाचित्र तहसीलदार यांना दस्तूरखुद्द पोलिसांनीच पाठविल्याने या प्रकरणाचे बिंग फुटले. 


वाळू चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला
शिवाय ट्रॅक्टर हत्यारी पोलिसांनी पकडल्यानंतर फरार होतात तरी कसे? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ‘सकाळ’मध्ये ‘पोलिसांच्या हातावर तुरी देऊन वाळू तस्कर फरारी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत होताच पोलिस यंत्रणेत खळबळ निर्माण झाली. शेवटी मंगळवारी (ता. २१) चार वाजताच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक संजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून विनाक्रमांक असलेले ट्रॅक्टर व प्रति दहा हजार रुपये ब्रास वाळू चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक संजय चव्हाण करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: पावसाने राज्याची चिंता वाढवली; पण पुढील वर्षासाठी गुड न्यूज! एल निनोबाबत ‘नोआ’नेमका काय वर्तवला अंदाज?

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

SCROLL FOR NEXT