sushmadevi motghare
sushmadevi motghare 
मराठवाडा

भीमगीत गायिका सुषमादेवी जगताहेत हलाखीचे जीवन

सकाळ वृत्तसेवा

लातूर : माझ्या भीमाच्या नावानं कुंकू लावीलं रमानं... साधीभोळी होती रमाई... भीमा तुझे आयुष्य... झिजली अशी रमाई... अशा एकाहून एक सुंदर भीमगीतांनी बांधवांना साद घालणाऱ्या, ज्यांच्या स्वरांनी चैतन्य संचारायचे अशा एकेकाळच्या प्रसिद्ध गायिका सुषमादेवी मोटघरे या सध्या आर्थिक परिस्थितीमुळे अडचणीत सापडल्या आहेत. हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्यासाठी लातूरकरांनी पुढाकार घेतला आहे. 


सुषमादेवी यांनी 1970-80च्या दशकात असंख्य गाणी गायिली. भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करून समाजप्रबोधन केले. त्यांचे विचार गीताच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जागर घातला; पण काळाच्या ओघात त्या आता प्रतिकूल परिस्थितीत असल्याने त्यांचा उचित सन्मान व्हावा आणि त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शहरातील विविध पक्षांचे, विविध विचारधारेचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. त्यांनी सुषमादेवी सन्मान सोहळा आयोजित केला आहे.

नामविस्तार दिनी सन्मान

ता. 14 जानेवारी रोजी शहरातील आंबेडकर पार्कवर होणार आहे. या कार्यक्रमात त्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मोहन माने, प्रा. अनंत लांडगे, अशोकराव कांबळे, केशव कांबळे, संजय सीतापुरे, संजय सोनकांबळे, बालाजी कांबळे, राजकुमार होळीकर, विजयकुमार गायकवाड, नागेश वाघमारे, बालाजी गवळी, दिलीप गायकवाड, हर्षवर्धन सवई, बालाजी माने, अरविंद कांबळे, संजय सोनकांबळे, कुमार सोनकांबळे यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेने आणि इतर नागरिकांनीही सढळ हाताने मदत करावी, असेह आवाहन माने यांनी पत्रकार परिषदेत केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT