photo 
मराठवाडा

सेनगावात सहा लाखांचा गुटखा जप्त

जगन्नाथ पुरी

सेनगाव(जि. हिंगोली): येथील एका गोडाऊनमध्ये शुक्रवारी (ता.२७) रात्री बाराच्या सुमारास स्‍थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून शासनाने प्रतिबंधीत केलेला सहा लाख ३६ हजार ६४५ रुपयांचा गुटखा जप्त करून दोघांना सेनगाव पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.  

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव शहरात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा येत असल्याची व भगवान ढाकणे व मनिष वाकडे यांच्या ताब्यातील गोडाऊनमध्ये साठवणूक करीत असल्याची माहिती स्‍थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना मिळाली होती. त्‍यानंतर श्री. चिंचोलकर, पोलिस उपनिरिक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने शुक्रवरी रात्री उशीरा येथे धाड टाकली.

विक्री करण्याचे उद्देशाने साठवणूक

 यावेळी भगवान ढाकणे यांच्या घरात गुटखा आढळून आला. या बाबत अधिक चौकशी केली असता सदरचा गुटखा त्‍याने स्‍वतः विक्री करण्याच्या उद्देशाने घरामध्ये साठवणूक केल्याचे सांगितले. तसेच दुसऱ्या ठिकाणी मनिष वाकळे यांच्या ताब्यातील गोडाऊनवर छापा टाकला असता तेथेही गुटखा आढळून आला. सदरचा गुटखा त्‍याने विक्री करण्याचे उद्देशाने साठवणूक केल्याचे निष्‍पन्न झाले. सदर गुटख्यात महाराष्ट्रात विक्री, साठवणूक व वाहतुकीसाठी प्रतिबंधित असलेला विविध कंपनीचा एकूण सहा लाख ३६ हजार ९४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

सेनगाव पोलिस ठाण्यात नोंद

सेनगाव पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक एस. एस. घेवारे यांच्या फिर्यादीवरून भगवान ढाकणे, मनिष वाकळे (रा. सेनगाव) यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक शिवसांब घेवारे, संभाजी लेकुळे, राजुसिंग ठाकूर, फुलाजी सावळे, विठ्ठल कोळेकर, ज्ञानेश्वर सावळे, महेश बंडे, आकाश टापरे, रविना घुमनर यांच्या पथकाने केली आहे.  

गावपातळीवरही सहज मिळतोय गुटखा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोदामावर छापा टाकून तब्बल सहा लाख ३६ हजार ९४५ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असला तरी गावपातळीवरही गुटखा सहज उपलब्ध होत आहे. गुटखा विक्री करणारांनी वेगळी यंत्रणा तयार केली असून या यंत्रणेमार्फत गुटखा विक्री होत आहे. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. पोलिस प्रशासनाने ठोस भूमिका निभावली असली तरी अन्न प्रशासन विभागानेही ठोस कारवाइ केल्यास यावर प्रतिबंध बसण्यास मदत मिळेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

Pune Crime : तळलेल्‍या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर; ‘एफडीए’ ची ५ ठिकाणी धाड, १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

Jalana Viral Video: दागिन्यावर डोळा, गावकऱ्यांनी भोंदूबाबाला दिला चांगलाच चोप, काय घडलं?

समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजच्या परिसरात छोट्या विमानाच्या गिरट्या; नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण...

Satana Suspicious Case : मध्यरात्रीच्या संशयास्पद विधीने खळबळ; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल, तपास वेगात

SCROLL FOR NEXT