प्रतिकात्मक छायाचित्र 
मराठवाडा

राजस्थानात झालेल्या अपघातात औशातील सहा जणांचा मृत्यू

जलील पठाण

औसा(जि. लातूर ) ः लातूरहून हरियानातील हिस्सार येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या मिनीबसला झालेल्या अपघातात औसा तालुक्‍यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक सहा वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. या अपघातात एकूण तेरा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर नऊजण गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली असून, बसपुढे अचानक जनावर आल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून मिनीबस झाडावर आदळल्याने हा अपघात घडला. मृतांमध्ये औसा तालुक्‍यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. 

पहाटे काळाचा घाला
लातूर येथून हरियाना येथील हिस्सार येथे देवदर्शनाला निघालेल्या मिनीबस (एमएच-23, एएस-7176) ला राजस्थान येथील किशनगढ ते हनुमानगढ या मार्गावर कालाभाटाजवळ पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला. त्यात औसा तालुक्‍यातील भगवान बेळंबे (वय 50, याकतपूर), मयूरी बेळंबे (वय 18, याकतपूर), सिद्धी गोवर्धन सांगवे (वय नऊ, लामजना), सुमित्रा सांगवे (35, लामजना), सुप्रिया पवार (16, किल्लारी), अरुणा तौर (55, किल्लारी) यांचा मृत्यू झाला आहे, तर आदर्श सांगवे (सहा) हा बालक जखमी झाला आहे.

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. हा अपघात झाल्याचे समजताच औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी राजस्थानमधील भाजप कार्यकर्त्यांना तातडीने फोनवर माहिती देऊन जखमींना रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली. त्याचबरोबर राजस्थान येथील मुख्यमंत्री कार्यालय आणि आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधून जखमींना तातडीने मदत मिळण्याची व्यवस्था केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

SCROLL FOR NEXT