फोटो 
मराठवाडा

गोळीबार प्रकरणी ‘हा’ सहावा आरोपी कोठडीत

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कॉंग्रेसचा पदाधिकारी गोविंद कोकुलवार यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात विरेंद्र उर्फ विरु भंडारी याला मोक्का अंतर्गत बुधवारी (ता. २५) अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील यांनी त्याला गुरूवारी (ता. २६) औरंगाबाद मोक्का न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने विरु भंडारीला तीन जानेवारी २०२० पर्यंत (आठ दिवस) पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

चौफाळा परिसरातील विणकर कॉलनीत राहणारे कॉंग्रेसचे पदाधिकारी गोविंद तुळशीराम कोकुलवार यांच्यावर ता. १७ आॅगस्ट रोजी गोळीबार करून हल्लेखोर दुचाकीवरून पसार होते. हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोर हे श्री. कोकुलवार यांच्या गाडीचा पाठलाग करीत होते. हा प्रकार शहरातील वेगवेगळ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. यावरून पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. 

आतापर्यंत सहा जणांना अटक, रिंदा फरार

पोलिसांनी यापूर्वी बजरंग उर्फ यौध्दा भिमराव नरवाडे, राजू देवराव राऊत, गुरूचरणसिंग उर्फ लक्की संपुर्णसिंग गील, सय्यद नजीजोद्दीन उर्फ गुड्डू सय्यद मुनीरोद्दीन आणि सुभाष मोहन पवार यांना अटक केली होती. यातील सुभाष पवार हा पेन (जिल्हा रायगड) कारागृहात होता. हे पाचही आरोपी सध्या कारागृहात आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार एक पिस्तुल, जीवंत काडतुस व एक दुचाकी जप्त केली आहे.


विरेंद्र उर्फ विरु भंडारीला पोलिस कोठडी

त्या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी धनंजय पाटील हे करीत असतांना या गुन्ह्यात सहभागी असलेला येथील सातवा आरोपी विरेंद्र उर्फ विरु सोपानराव कानोजी उर्फ भंडारी (वय ३६) याचा संबंध आला. वरील आरोपींसह विरू भंडारीसुध्दा कुख्यात रिंदाच्या नावाचा वापर करीत असल्याचे पुढे आल्याने श्री. पाटील यांनी त्याला बुधवारी (ता. २५) अटक केली. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेऊन त्याचेकडून सात मोबाईल जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गोविंद कोकुलवार हे मुंबई व नांदेड उपचार घेत असतांना त्यांची सुश्रुषा करण्यात सर्वात पुढे असलेला विरु भंडारी अचानक या गंभीर गुन्ह्यात अडकला म्हणजे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या गुन्ह्यातील हरविंदरसिंग उर्फ रिंदा हा अजूनही फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी एका विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या गुन्ह्याचा तपास धनंजय पाटील करीत आहेत. 


  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT