dam sakal
मराठवाडा

मोठ्या ११ धरणातील पाणीसाठा झाला साठ टक्के

मान्सूनचे मराठवाड्यात झालेले पुनरागमन यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : सुरुवातीला झालेला जोरदार पाऊस आणि आता गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचे मराठवाड्यात झालेले पुनरागमन यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठा फारसा समाधानकारक नाही. मोठ्या ११ धरणात ६० टक्के पाणीसाठा झाला आहे.

जलसंपदा विभागाकडून प्राप्त शुक्रवार (ता. २७ ) पर्यंतच्या अहवालानुसार मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांची प्रकल्पातील ५१४३ दशलक्ष घनमीटर संकल्पित पाणी साठा आहे यांपैकी ४८२५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला असून यांपैकी ३०९० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. आठवडाभरात १९०६ दशलक्षघनमीटर पाणी वाढले आहे. हा साठा ६० टक्के इतका आहे, गेल्या वर्षी याच तारखेला ७८ टक्के पाणीसाठा होता.

तसेच ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये ४१२ दशलक्षघनमीटर उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी ५८ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता, त्या तुलनेत मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा कमी आहे. तसेच ७५३ लघू पाटबंधारे प्रकल्पात सध्या ६६९ दशलक्ष घनमीटर तर ४० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीही ४० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

अद्यापही २८ लघुप्रकल्प कोरडेठाक

आठ जिल्ह्यात मिळून ७५३ लघू प्रकल्प आहेत यांपैकी औरंगाबाद जिल्ह्यातील ५, बीड जिल्ह्यातील ६, लातुर जिल्ह्यातील ९ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ८ असे २३ प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत तर १६४ लघूप्रकल्पात जोत्याच्या खाली पाणी आहे. २२१ लघू प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी तर ८७ लघूप्रकल्पात २५ ते ५० टक्के पेक्षा कमी पाणी आहे. ५७ लघूप्रकल्पात ५० ते ७५ टक्के तर १९६ लघूप्रकल्पात ७५ टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे.

आठ मध्यम प्रकल्प जोत्याखाली

मराठवाड्यात ७५ मध्यम प्रकल्प आहेत त्यातील सर्वच प्रकल्पात पाणी जमा झाले असले तरी ८ प्रकल्पात जोत्याच्या खाली पाणी आहे. २३ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी तर २१ प्रकल्पात २५ ते ५० टक्के पाणी साठा झाला आहे. तर ७ प्रकल्पात ५० ते ७५ टक्के आणि १६ मध्यम प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

मोठ्या धरणातील साठा (आकडे दशलक्ष घनमीटरमध्ये )

प्रकल्पाचे नाव............उपयुक्त पाणीसाठा ..........टक्केवारी

० जायकवाडी -...........९०८ ........................४२

० येलदरी ...............६९३ ...........................८६

० सिद्धेश्वर ...............७९...........................९७

० माजलगाव .............१११...........................३५

० मांजरा ..................४०............................२२

० ऊर्ध्व पेनगंगा ...........७८० .......................... ८१

० निम्न तेरणा ...............४७ ..........................५२

० निम्न मनार .................१३७ ..................... ९९

० विष्णूपुरी ..................७९ ..........................९८

० निम्न दुधना ................२१६.......................८९

० सीना कोळेगाव............००.........................०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आचारसंहितेत अडकला दिवाळीचा बोनस; निवडणूक आयोगाच्या परवानगीसाठी प्रयत्न

तरुणांनो, मला तुमचा अभिमान! दिल्लीतील आंदोलनावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; मोदी सरकारला दिला थेट इशारा, काय म्हणाले?

Marathi News Live Updates : तुषार गांधी यांना अटक, आदित्य ठाकरे, संजय राऊत DN नगर पोलीस ठाण्यात

Delhi Protest High Drama : निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; दिल्लीत भाजपच्या आमदाराच्या लेकीला पोलिसांकडून ताब्यात! फोटो समोर

Shubham Shelke Court Verdict : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळकेंना न्यायालयाकडून मोठा दिलासा; 5 लाखांच्या बाँडसह जामिनाचा पोलिसांचा आदेश रद्द

SCROLL FOR NEXT