File photo 
मराठवाडा

Videp : ‘संगीता’ची आवड जोपासणारे पासष्टवर्षीय काका  

शिवचरण वावळे

नांदेड : आनंदी जीवन जगायला धनदौलतीची ना पैशाआदल्याची गरज नसते. हे खरे असले तरी दिवस उजाडल्यापासून ते रात्री अंथरुणात झोपेपर्यंत अनेक जण पैसा आणि धनदौलतीच्या मागे धावतात, हे नाकारता येत नाही. मात्र, जगभरात अनेक आवडी-निवडी आणि मनसोक्त जगणारी निरनिराळी मंडळी नेहमीच आपल्या वाचनात व बघण्यात असतात. अगदी अशीच एक व्यक्ती ज्यांना जेवन आणि धनदौलतीपेक्षाही सिने-संगीताची सर्वाधिक भूक आहे. होय हे खरे आहे.

मूळ हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शेवाळा गावचे एक ६५ वर्षीय व्यक्ती आजही संगीत ऐकल्याशिवाय अन्न ग्रहन करत नाहीत. इतके संगितवेडा हा ग्रहस्त दहावी पास झालेला एक युवक कामाच्या शोधात नांदेडात आला आणि एका कापड दुकानावर नोकरी करू लागला. पण इथे येण्यापूर्वीच या अवलियाने तालुक्याच्या थेअटरमध्ये जाऊन शेकडो सिनेमे बघितले. यामुळे सिनेमा, संगीत, गायक, कलाकार यांच्याबद्दल त्यांना चांगलीच जवळीकता निर्माण झाली होती. शहरात आल्यानंतरदेखील त्यांनी संगीत आणि सिनेमाचा छंद सोडला नाही.

दहा पैशा पासून साडेतीनशे रुपयाची संगित पुस्तके
या अवलियाचे नाव आहे शंकर धोंगडे. हे आजही संगीत एक संगीत असा जप करतात. गावी असतानाच दिवसभराची कामे वेळेत आटोपून रात्री विविध भारतीवरून प्रसारित होणाऱ्या संगीताचा अस्वाद घेण्यासाठी दुसऱ्याच्या घरी आवर्जून हजेरी लावत आणि संगीताचा आनंद घेत. त्यांचा गाण्याचा छंद असा होता की, मिळेल तिथून गाण्यांची पुस्तके विकत घेत. म्हणून आजही त्यांनी दहा पैसे किंमत असलेल्या सिनेसंगीताच्या पुस्तकांपासून ते साडेतीनशे रुपये किमतीची सिनेगीतांची पुस्तके सांभाळून ठेवली आहेत.

कपड्याच्या दुकानात कपड्यापेक्षा संगीताची पुस्तके अधिक
सध्या त्यांचे कपड्याचे छोटेशे दुकान असून, या दुकानात कपडे कमी आणि संगीताची पुस्तके, गायक कलाकार, संगीतकार, सिनेदिग्दर्शकांची इत्यंभूत माहिती असलेल्या अनेक पुस्तकांचा खजानाच भरला आहे. दुकानात एक रेडीओदेखील आहे. सोबत हवे तेव्हा स्वतःच्या गायणाची हाऊस भागवण्यासाठी बूम माईकदेखील आहे. सकाळी रेडीओ सुरू झाल्यापासून ते विविधभारतीचे सर्व गीतांवर आधारित कार्यक्रम संपेपर्यंत त्यांचे मन भरत नाही. इतकेच नव्हे तर या संगीतवेड्या अवलियाने आपल्या दोन्ही मुलांची नावेदेखील किशोर आणि मुकेश या गायकांची नावे मुलांना दिली आहेत.

संगीतामुळे मी खूप आनंदी आहे

आयुष्यात कुठल्याही पुडी काडीचे व्यसन लागले नाही. पण आनंदी जगण्यासाठी लहानपणापासून एक व्यसन जडले ते संगीताचे आणि आजही संगीताशिवाय माझी ‘सकाळ’ होत नाही. जेवणापेक्षा संगीत महत्त्वाचे वाटते. मी वेगळी आवड जपतो म्हणून माझे मित्र मला संगीताविषयी वर्तमान पत्रातून काही माहिती आली की ती माहिती माझ्यापर्यंत पोचवतात. संगीतामुळे मी खूप आनंदी आहे. 
- शंकर धोंगडे, नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT