मराठवाडा

‘स्मार्ट सिटी’ ऑफलाइनच

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - अडीच-तीन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करीत ‘स्मार्ट सिटी’ची घोषणा करण्यात आली. शहर स्मार्ट करण्यासाठी शासनाने कोट्यवधींचा निधी दिला; मात्र महापालिकेच्या कासगवगती ‘स्मार्ट सिटी’च्या कारभारातही शिरली असून, कामकाजाची माहिती देणारी साधी वेबसाइटसुद्धा दोन वर्षांत तयार करता आलेली नाही. महापालिकेच्या वेबसाइटवरूनही स्मार्ट सिटीची कामे बेदखल करण्यात आली असून, अद्याप एकाही कामाची माहिती अपलोड करण्यात आलेली नाही.

औरंगाबाद शहराचा तिसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाने महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. त्यानुसार पॅनसिटी, ग्रीनफिल्डच्या कोट्यवधी रुपयांच्या योजनांवर चर्चा झडल्या; मात्र गेल्या अडीच वर्षांत केवळ कागदोपत्री अहवाल तयार करण्याची कामे सुरू आहेत. गतवर्षभरात केवळ ६० लाखांचा सौरऊर्जा प्रकल्प झाला; तर यंदा जानेवारीत शहर बससेवेचे उद्‌घाटन करण्यात आले. एमएसआयच्या १२० कोटींची निविदा सहा महिन्यांपासून अंतिम होऊ शकलेली नाही. त्यानंतर स्मार्ट रोड, स्मार्ट वॉटर, ऐतिहासिक वारशांचे जतन करण्यासाठी एरिया डेव्हलपमेंट यासह इतर कामे स्मार्ट सिटी प्रकल्पात घुसडण्यात आली. या कामांचे अद्याप प्रकल्प अहवाल देखील तयार नाहीत. त्यामुळे शहर स्मार्ट कधी होणार? हा नागरिकांचा प्रश्‍न कायम आहे. विशेष म्हणजे स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत महापालिका काय करणार? कोणती कामे सध्या सुरू आहेत? याची माहिती नागरिकांना नव्हे, तर नगरसेवकांनासुद्धा मिळत नाही. कारण स्मार्ट सिटीची अद्याप वेबसाइटदेखील तयार करण्यात आलेली नाही. स्मार्ट सिटीचे काम पाहणाऱ्या सीएचटूएम या पीएमसीला महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये दिले; मात्र या कंपनीने समाधानकारक काम केले नाही.

जुनी वेबसाइट केली बंद 
स्मार्ट सिटीसाठी नागरिकांकडून फिडबॅक घेण्यासाठी तत्कालीन पीएमसीने वेबसाइट तयार केली होती. त्यावर नागरिकांनी मते नोंदविली. त्यानुसार स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार करताना महापालिकेला मदत झाली. आता मात्र स्मार्ट सिटीचे काय सुरू आहे, याची माहिती नागरिकांना मिळणे अवघड झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT