hingoli photo
hingoli photo 
मराठवाडा

लॉकडाउनमुळे दोन महिन्यानंतर दरवळतोय सुंगध

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाडनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प पडले होते. त्‍यात नेहमी गजबजलेली फुलमंडई अपवाद नव्हती. आता लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्याने फुलमंडई सुरू झाली आहे. लॉकडाउनमुळे हिरावलेला फुलांचा सुंगध दोन महिन्यांनंतर दरवळत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

शहरातील फुलमंडईत पंधरा ते वीस फुलविक्रेत्यांची दुकाने आहेत. हे विक्रेते जिल्‍ह्यातील उत्‍पादकांकडून फुलं विकत घेऊन त्‍याचे हार, गुच्‍छ, वेण्या तयार करून विक्री करतात. दररोज विविध दुकानांसह विविध देवतांच्या मंदिरात, कार्यक्रमात व लग्नात पुष्पहारांची चांगली मागणी असते. यामुळे या व्यावसायिकांचा उदरनिर्वाह होतो. 

सर्वच व्यवहार ठप्प

तसेच जिल्‍हाभरातून येथे फुलं विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या फुलउत्‍पादकांनादेखील यातून रोजगार मिळतो. मागच्या दोन ते अडीच महिन्यांपासून कोरोनाचे संकट उभे ठाकल्याने जिल्‍ह्यात लॉकडाउन, संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्‍यात फुलमंडईदेखील आली होती. ऐन लग्नसराईचा कालावधी व कोरोनाचे संकट एकाच वेळी आल्याने आर्थिक व्यवहाराची होणारी आवक बंद झाली. 

पुष्पहार व फुलांची विक्री मंदावली

यातून पुष्पहार विक्रेत्यांसह फुलउत्‍पादक अडचणीत सापडले होते. सध्या लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्याने फुलमंडई सुरू झाली आहे. मात्र, अद्यापही मंदिरे उघडण्यास परवानगी नाही. तसेच लग्नासाठीदेखील केवळ पन्नास व्यक्‍तींना परवानगी मिळत असल्याने पुष्पहार व फुलांची विक्री मंदावली असल्याचे हे विक्रेते सांगत आहेत. येथे उपलब्ध झालेल्या फुलांमध्ये गलांडा, काकडा, निधीगंध फुलांचा समावेश आहे.

लग्नसराई हातची गेली

दोन महिन्यांपासून पुष्पहाराची विक्री बंद झाली होती. यावर घरसंसार चालतो. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे अडचणी उभ्या टाकल्या आहेत. लग्नसराई हातची गेली आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्याने फुलमंडई सुरू झाली असली तरी मागणी मात्र कमी आहे.
-शेख रहीम, फुल विक्रेते


खासगी वाहनधारकांना लॉकडाउनचा फटका

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून लॉकडाउन सुरू आहे. ऐन लग्नसराईत लॉकडाउन सुरू झाल्याने त्‍याचा फटका खासगी वाहनचालकांना बसला आहे. त्यामुळे कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाहने आता लॉकडाउमुळे बंद पडली 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका प्रत्येक व्यवसायाला बसला आहे. यातून खासगी वाहनधारकदेखील सुटले नाहीत. नेहमीच प्रवाशांनी गजबजून जाणारी वाहने आता लॉकडाउमुळे बंद पडली आहेत. खासगी वाहनाचालकांना लग्नसराईत चांगली मागणी असते. तसेच या कालावधीत शालेय सुट्या असल्याने अनेकांचा पर्यटनाचा बेत असतो. यामुळे खासगी वाहनधारकांना यातून रोजगार मिळतो. मात्र, या वर्षी सर्वच बंद झाले.

हप्ते कसे फेडावेत याची चिंता

 सध्या सीमाबंदी असल्याने बाहेर गावी प्रवास करणे अशक्‍य झाले आहे. एखाद्या प्रवाशास बाहेरगावी नेणे किंवा आणले तरी पंधरा दिवस अलगीकरण कक्षात राहावे लागत आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून वाहने जागेवरच उभी आहेत. त्यामुळे वाहनचालक, मालकांवरसमोर आर्थिक प्रश्‍न उभा ठाकला आहे. अनेकांनी फायनान्सवर वाहने खरेदी केली आहेत. आता हप्ते कसे फेडावेत, हादेखील मोठा प्रश्न असल्याने वाहनचालक अडचणीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT