Sneha Savle Sakal
मराठवाडा

वीस दिवसांत वर्ग दोनची दोन पदे खिशा

लातूच्या स्नेहा सावळे यांच्या करिअरची वेगळी वाटचाल ; एमबीबीएस सोडून स्पर्धा परीक्षेची तयारी

विकास गाढवे

लातूर - आजोबा व वडिलांकडून प्रशासकीय सेवेचे बाळकडू घरातच मिळाले. प्रॅक्टीकलमध्ये कधीच स्वारस्य (इंटरेस्ट) नव्हते आणि प्रशासकीय सेवेचे लहानपणापासूनच आकर्षण होते. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाला (एमबीबीएस) प्रवेश घेऊनही तिथे मन रमले नाही. दोन महिन्यानंतर एमबीबीएस सोडून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. तयारीतील सर्वात महत्वाचा गुण `संयम` अंगी बाळगला. यशाने अनेकदा हुलकावणी दिली. मात्र, वीस दिवसांच्या फरकाने वर्ग दोनची दोन पदे हातात आली. येथील स्नेहा रविशंकर सावळे यांच्या या करिअर प्रवासातील वेगळी वाटचाल थक्क करणारी आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा २०२० मधून त्यांची ३१ मे रोजी कक्ष अधिकारी तर वनसेवा २०१९ मधून सोमवारी (ता. २०) त्यांची वनक्षेत्रपालपदी निवड झाली आहे. स्नेहा सावळे यांचे प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण येथेच झाले. त्यांचे वडील रविशंकर सावळे यांनी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य म्हणून अनेक वर्ष काम केले. सध्या ते सोलापूरला जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आजोबा बाबुराव सावळे हे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयात अधीक्षक होते. सहकार विभागातून ते वर्ग दोन पदावरून सेवानिवृत्त झाले.

आजोबा (आईचे वडील) टी. जी. अप्पास्वामी हे गटविकास अधिकारी म्हणून काम केल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. यामुळे लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेचे आकर्षण होते. मात्र, सर्वांनाच डॉक्टर व्हावे वाटत होते. २०११ मध्ये सीईटीतून निवड झाल्यानंतर धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलाही. पूर्वीपासूनच थिअरीमध्ये इंटरेस्ट होता. दोन महिने कसेबसे शिक्षण घेतले. मात्र नंतर एमबीबीएसचे शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. सर्वांनाच हा निर्णय धक्का देणारा होता.

घरातून भक्कम पाठिंबा

राज्यसेवा व वनसेवा परीक्षेतील वेगळेपण लक्षात घेऊन तयारी केली. आई विद्या गृहिणी आहेत तर बहिण चिन्मई एमबीएचे शिक्षण घेत आहेत. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी घरूनच प्रेरणा व भक्कम पाठिंबा मिळाला. अन्य मुलींप्रमाणे कुटुंबांने विवाहासाठी डोक्यावर टांगती तलवार ठेवून `अल्टीमेटम`ही दिला नाही. यामुळे संयमाने स्पर्धा परीक्षेची तयारी करता आल्याचे स्नेहा सावळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: भरदिवसा व्यावसायिकाच्या गाडीची डिकी तोडून 2.85 लाख लंपास

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

SCROLL FOR NEXT