file photo 
मराठवाडा

नांदेड विभागातील काही रेल्वे रद्द 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना या जीवघेण्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महत्वाच्या चार रेल्वेगाड्या रद्द तर दोन अंशत:  रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून दिलेल्या प्रसिद्धीपत्रानुसार देण्यात आली आहे. 

रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे 
 
ँ गाडी क्रमांक १७६२ नांदेड ते औरंगाबाद ता. २० मार्च ते २७ मार्च.
ँ गाडी क्रमांक १७६१९ औरंगाबाद ते नांदेड ता. २३ मार्च ते ३० मार्च.
ँ गाडी क्रमांक १७६२१ औरंगाबाद ते रेणीगुंठा ता. २० मार्च ते २७ मार्च. 
ँ गाडी क्रमांक १७६२२ रेणीगुंठा ते औरंगाबाद ता. २१ मार्च ते २८ मार्च. 

तर अंशत: रद्द केलेल्या गाड्या

ँ गाडी क्रमांक ५१४३३ निझामबाद ते पंढरपूर ता. एक एप्रील ते ३० एप्रील या काळात निझामाबाद ते नांदेड.
ँ गाडी क्रमांक ५१४३४ पंढरपूर ते निझामाबाद ता. एक एप्रील ते ३० एप्रील नांदेड ते निझामाबाद.

फुकट्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा 

नांदेड : बीअरबारमधून फुकट दारु व दरमहा पाच हजाराची खंडणी मागणाऱ्या दोघांविरुद्ध नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात खंडणीचा व भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सरसम (ता. हिमायतनगर) येथील व ह. मु. सुमन हाईट्स, फरांदेनगर येथे राहणारे श्‍याम श्रीधरराव देशमुख हे अंगेठी बीअरबार चालवतात. त्यांच्या हॉटेलमध्ये सल्लु भाटीया रा. कौठा आणि सिद्धेश्‍वर उर्फ सिद्धु काळे रा. रवीनगर कौठा या दोघांनी संगनमत करुन अंगेठी बारमध्ये जावून तलवारीचा धाक दाखवून वेळोवेळी फुकट दारु घेऊन गेले. पुन्हा तीन बीअरच्या बाटल्या घेऊन निघून जात असतांना हॉटेल चालक श्री. देशमुख यांनी त्यांना पैशाची मागणी केली. यावेळी या दोघांनी त्यांना तलवारीचा धाक दाखवून आम्हाला फुकट दारु व दरमहा पाच हजार रुपये खंडणी द्यावी लागे असा दम भरला. यावरुन श्‍याम देशमुख यांनी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वरील दोघांवर खंडणीचा गुन्हा दाकल करण्यात आला आहे. तपास फौजदार शेख जावेद करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT