file photo
file photo 
मराठवाडा

दुधना अटताच दुभत्या जनावरांची कासही अटली, नदीपात्र कोरडे पडल्याने पशुंना मिळेना चारा

अनिल जोशी

झरी ( जिल्हा परभणी) : झरी (ता.परभणी) शिवारातून वाहणारी दुधना नदी अटल्याने परिसरातील पशुंना चारा मिळत नसल्याने दुभत्या जनावराची कास अटली आहे. ओला चारा नसल्याने दुध उत्पादनात निम्याने घट झाल्याने गोकुळ म्हणून प्रसिध्द असलेल्या पिंपळा गावातील पशुपालक संकटात सापडले आहेत. त्यामुळे लोअर दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी करु लागले आहेत.

झरी पासूनच दक्षिणेस दोन किलोमीटरवर पिंपळा ता परभणी या गावांमध्ये घरोघरी दुग्ध व्यवसाय केला जातो. मोठ्या संख्येने गावात दुभत्या जनावरांची संख्या आहे. त्यामुळे झरीसह परभणी शहरात देखील दुधाचा आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे परिसरात पिंपळा हे गोकुळ नावाने देखील प्रसिध्द आहे. पिंपळा हे गाव दुधा नदीच्या काठावर वसले असल्यामुळे या गावांमध्ये नदी परिसरात खूप प्रमाणावर ओला चारा असल्यामुळे गावातल्या प्रत्येक दोन-तीन म्हशी एक दोन गाई आहेत या गावांमध्ये गतवर्षी दुधा निमझरी मध्ये या गावातून दुधाचा पुरवठा केला जातो दुधाशिवाय खवा दही तूप आधी गोष्टी हेच गाव झरी ला पुरवतात परंतु यंदाच्या दुष्काळामुळे या गावातील दररोज 100 ते 120 लिटर दुधाची निर्मिती होत असे परंतु सद्यस्थितीत दुधना नदी कोरडे पडल्यामुळे तसेच रब्बी व खरीप हे पीक गेल्यामुळे अर्ध्याच्या वर गाई-म्हशींचा पानात कमी झाला आहे. सद्यस्थितीमध्ये गावामध्ये 50 ते 60 लिटर दूध पुरवल्या जात आहे या परिसरामध्ये हिरवा चारा नसल्यामुळे जनावरांचे दुधाचे प्रमाण अर्ध्यावर आले असल्याचे गावकरी सांगतात

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

माझ्याकडे हिवाळ्यामध्ये चाळीस ते पन्नास लिटर दूध निघायचे परंतु सद्यस्थितीत दुधना नदीला पाणी नसल्यामुळे व विहिरीचे व बोअरचे पाणी कमी झाल्यामुळे हिरवा चारा माझ्याकडे नाही त्यामुळे हे दुधाचे प्रमाण 20 लिटरवर आले आहे-

- सुरेश पांढरे,पशुपालक

गतवर्षी माझ्याकडे दोन ते तीन म्हशी होत्या त्यामुळे माझ्याकडे भरपूर दूध विकत असेल वेळेप्रसंगी दूध न विकल्यामुळे तूप करत असत परंतु आता दुष्काळामुळे जनावरांना ओला चारा नसल्यामुळे तू तर सोडूनच द्या पण माझ्याकडे निमित्त दूधवाल्यांनासुद्धा दूध नसल्यामुळे वेळेप्रसंगी एखाद्याने दुध जास्त मागितल्यास ते मी देऊ शकत नाही.

- रघुनाथ चव्‍हाण,पशुपालक

माझ्याकडे दोन्ही टाइमचे मिळून पन्नास लिटर दूध निघत होते हे दुधाचे झरी मध्ये नियमित दूध धारकास मी दूध देत असे. परंतु दुष्काळामुळे दुधाचा पान्हा कमी झाल्यामुळे आता माझ्याकडे केवळ 10 ते 15 लिटर दूध निघत असल्यामुळे दुधाची मागणी असूनही मी त्यास नेहमी दूधधारकास दूध देऊ शकत नाही.

- मारुती डोंबे, पिंपळा

दुधना नदीमध्ये पाणी सोडण्याची अत्यंत आवश्यकता

दुधना नदी काठ दुधना नदीला पाणी नसल्यामुळे हिरवा चारा तर सोडाच जनावरांना दोन वरचे पाणी मिळत नसल्यामुळे माणसाचे काय माणूस कुठूनही पाणी आणून पिता येईल परंतु मुक्या जनावरांचे मात्र दुधना नदीत पाणी नसल्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. यासाठी दुधना नदीमध्ये पाणी सोडण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

संपादन- प्र्ल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT