मराठवाडा

जळकोट तालुक्यात सोयाबीन पिक पावसाअभावी सलाईनवर, शेतकरी संकटात

विवेक पोतदार

जळकोट (जि.लातूर) : गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने मूग उडदासह फुलोऱ्यातील सोयाबीन पावसाअभावी (Rain Shortage) सलाईनवर आहे. ते सुकत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या पिकांना पावसाची प्रतिक्षा असल्याचे चित्र आहे. सध्या तालुक्यातील (Jalkot) शिवारात विविध खरीप पिकांना पावसाची गरज आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नाही. तर नुसते अधून-मधून (Latur) आकाशात ढग येत असून पावसाचा येत नसल्यामुळे शेतकरी (Farmer) अडचणीत सापडला आहे. सध्या मूगाला चट्टा लागला असल्याने शेंगा भरण्यासाठी पाऊस आवश्यक असल्याने हे पिक होरपळत आहे. उडदासह सोयाबीन फुलोऱ्यात (Soybean Crop) असून त्याची फुले टिकण्यासाठी व चट्ट्यात येण्यासाठी पावसाची नितांत गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

खरिपात महागडे बी-बियाणे, रासायनिक खते आदींवर मोठा खर्च करुन नंतर तण नियंत्रणासाठी बाजारातील महागडी तणनाशके फवारणी करावी लागली.त्यानंतर अलीकडे कीड व अळ्यासाठी पुन्हा कीटकनाशक फवारणी आदीसह मजुरीचा खर्च करुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात पाऊस नसल्याने सुकत असलेली पिके पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे.आंतरमशागतीची कामे उरकून शेतकरी पावसाची वाट पाहत असल्याचे चित्र आहे. मूग, उडीद, सोयाबीन या पिकातील आंतरमशागतीत कोळपणी आता थांबली असून पावसाअभावी पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

सध्या फुलोऱ्यात असलेल्या सोयाबीनला पावसाची नितांत गरज आहे. कारण त्याचे शेंगात रुपांतर होण्यासाठी पाऊस आवश्यक आहे. मूगाचे चट्टे भरणे कठिण आहे. पाऊस नसल्याने जमीन दगडासारखी कडक झाली आहे. अशा अवस्थेत दुपारी सोयाबीनसह सर्वच पिके कोमेजून जात असून मोठ्या पावसाची गरज आहे.

- पांडुरंग वाघमारे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

SCROLL FOR NEXT