Rajur Ganpati Temple 
मराठवाडा

राजुरला कोरोना पार्श्‍वभुमीवर विशेष वैद्यकीय पथक 

ज्ञानेश्वर पुंगळे

राजूर (जि.जालना) -  संकष्ट चतुर्थी निमित्त राजूर (ता.भोकरदन) येथील गणपती संस्थानात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. संपूर्ण जगात वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणुंच्या पार्श्‍वभुमीवर त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संस्थानाला दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. संकष्ट चतुर्थी निमित्त गुरूवारी (ता.१२) परिसरात विशेष वैद्यकीय पथक तैनात करण्यात येणार आहे. 

राजूर येथील गणपती मंदीर परिसर संकष्ट चतुर्थी निमित्त लाखो भाविकांनी गजबजून जातो. जगभरात कोरोना विषाणुंचे संकट उदभवले आहे. या पार्श्‍वभुमीवर कोरोना विषाणु संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या मदतीने मंदिर परिसरात कोरोना विषाणू संसर्ग बाबत माहिती देण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष मदत केंद्राची स्थापना करण्यासह ते चोवीस तास सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मंदिर परिसरात स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करण्याबाबत कळविले आहे. संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रूग्णवाहिकेची व्यवस्था तसेच आवश्यक औषधी साठा उपलब्ध करून देण्यासाठी ही कळविण्यात आले आहे. शिवाय पोस्टर, स्टिकर, फलक यातून जनजागृतीही केली जाणार आहे. स्वतंत्र नोडल अधिकारी ही नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

जगभरात कोरोना विषाणुंचे संकट पाहता गणपती संस्थानात भाविकांनी दर्शन घेताना जास्त गर्दी करू नये. खोकताना तसेच शिंकताना तोंडावर रुमाल धरावा, टिश्‍शूपेपरचा वापर करावा, संशयित रुग्ण आढळल्यास मदत केंद्राला कळवावे, असे तहसीलदार तथा संस्थानचे अध्यक्ष संतोष गोरड यांनी कळविले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT