file photo
file photo 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यातील १८ एसआरपी जवानांना विशेष सेवा पदक मंजूर

राजेश दारव्हेकर

हिंगोली : गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात पोलिस अधिकारी व अंमलदारांनी दोन वर्षे तर राज्य राखीव पोलिस दलाचे अधिकारी तसेच अंमलदारांनी एक वर्षे समाधानकारक सेवा पूर्ण केली असल्याने त्यांनी खडतर सेवेबद्दल ता. ३० डिसेंबरला विशेष सेवा पदक मंजूर करण्यात आले. ज्यामध्ये जिल्ह्यातील १८ जवानांचा समावेश आहे.

विशेष सेवा पदक मंजूर केलेल्यांमध्ये राज्य राखीव 

पोलिस बल गट क्रमांक येथील खलील  शेख , विकास  खवले , निलेश शेळके,  संतोष  ढवळे , अनिल आवटे , गणेश  काळे , रमेश तायडे , ज्ञानोबा  केंद्रे , अविनाश मदेवकर , गोपीनाथ घुगे , कैलास  जोगेवार , सचिन सोनटक्के , सुनील  नाईक , अतुल रंबे, सलीम अय्युब शेख , सुमेधबोधी  कांबळे , अतुल  पंडीत , बालाजी  जोरगेवार , सचिन अंभोरे यांचा समावेश आहे.

दरम्यान, हिंगोलीचे राज्य राखीव दल शिस्तीसाठी प्रसिध्द आहे.राज्यासह बाहेर राज्यात देखील निवडणुक काळात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी राखीव दलाच्या कंपनीला बोलावले जाते. याशिवाय नक्षलग्रस्त भागातही हिंगोलीच्या राखीव पोलिस दलातील जवान चोख कर्तव्य बजावतात. दरम्यान, नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला पोलिस महासंचालक कार्यालयाने विशेष सेवा पदकाची घोषणा केली आहे.राखीव दलाचे समादेशक संदिप गिल यांनी जवानाचे स्वागत केले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT