Monday Special esakal
मराठवाडा

Shravan Special : हिंगळजवाडीत गोलाकार फिरणारी महादेवाची पिंड

श्रावणातील सोमवारी दर्शनासाठी लागते रांग

सकाळ वृत्तसेवा

Dharashiv News- तालुक्यातील हिंगळजवाडी येथील हिंगळजदेवी मंदिरात सतराव्या शतकातील श्री भगवान शिवशंकर यांचे मंदिर असून या मंदिरातील शिवशंकराची पिंड चक्क गोलाकार फिरते.

धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथे हिंगळजदेवी मंदिर असून याच मंदिरात १६९४ ला बांधलेले श्री भगवान शिवशंकर यांचे मंदिर असून पिंड पाषाणाची असून चक्क गोलाकार फिरते. पिंडीच्या खालच्या भागात विशिष्ट ठिकाणी बेअरींगसारखी व्यवस्था असावी असा अंदाज आहे.

याचं मंदिरात गणपती, गरूडावर बसलेले लक्ष्मी विष्णू, सूर्यनारायण, महिषासुराचा वध केलेल्या मूर्ती असून त्यांचे अत्यंत रेखीव व कोरीव काम केलेले आहे.

मंदिराच्या प्रवेश द्वारावर हनुमंताची मूर्ती उत्कृष्ट कलाकुसरीची कोरलेली आहे. मंदिरासमोर दगडी नंदी असून आकर्षण व हुबेहूब कलाकृती कोरलेली आहे. हिंगजळदेवी मंदिरात श्री. भगवान शिवशंकराची गोलाकार फिरणारी मूर्ती पाषाणाची असल्याने भाविक भक्त आवर्जून याठिकाणी दर्शनासाठी जातात.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Commonwealth Para Athletics: तोरणडोंगरीच्या जिल्हा परिषद शाळेतील दिलीप गावितची ग्लास्गो राष्ट्रकुल पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णभरारी

Ambad Vegetable Market: अंबडच्या आठवडी बाजारात पावसाने भाजीपाल्याची मोठी नासाडी; शेतकरी‑विक्रेते बेभाव विक्रीला मजबूर

SCROLL FOR NEXT