Osmanabad Accident News
Osmanabad Accident News esakal
मराठवाडा

तुळजापूर-लातूर रस्त्यावर शिवशाही बस व ट्रकचा अपघात, सहा जण जखमी

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद ) : तुळजापूर-लातूर रस्त्यावर ट्रक आणि शिवशाही बसचा अपघात शनिवारी (ता.२८) झाला. अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना तुळजापूर-लातुर रस्त्यावर बायपासजवळ सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत, शौनकबी नसीर पटेल (वय ६५, राहणार केशेगांव ता.तुळजापूर), शोभा यशवंत कानडे (वय ६०, राहणार तुळजापूर), हमनाराम निरानाम (वय ३५, रा. राजस्थान), महुद्दीन सरदार शेख (वय २९, रा. चडचण, कर्नाटक), एसटी चालक किरण रंगनाथ गुंडले ( वय ३१, रा. दवेली, ता.रेणापूर), सोपान विठ्ठल भागवत (४३, रा.लातूर) आदी. लातुर (Latur) - सोलापूर शिवशाही बस (एमएच ०६ इडब्लू ८९८) आणि ट्रक (आरजे १९ जीएफ ७६५७) यांचा अपघात झाला. एसटी आणि ट्रक दोन्हीही बायपासजवळ एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. घटनास्थळी आगारप्रमुख राजकुमार दिवटे यांनी भेट दिली आहे. गंभीर जखमी शौनकबी पटेल यांना उस्मानाबादेत (Osmanabad) उपचारासाठी हलविण्यात आलेले आहे. (ST Bus Truck Accident On Tuljapur Latur Road, 6 People Injured In Osmanabad)

पुन्हा अपघातांची मालिका

तुळजापूर-लातुर रस्त्यावर आज शनिवारी याच ठिकाणी दुचाकीचा अपघात झाला. तसेच दुपारी बारा वाजता कार-ट्रक अपघातात याच ठिकाणी दोन जण जखमी झालेले आहेत. आणि सायंकाळी सहा वाजता सहा जण ट्रक आणि शिवशाही बस अपघातात जखमी झालेले आहेत.

तुळजापूर-लातुर रस्त्यावरील बायपासजवळ आज एकाच ठिकाणी तीन अपघात झाले. तेथे उड्डाण पूल करावा, यासाठी आम्ही वारंवार मागणी करीत आहोत.

- पंकज शहाणे, लोकसेवा फाऊंडेशन, तुळजापूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT