file photo
file photo 
मराठवाडा

मद्य विक्रीला सुरवात; परवाना नसल्याने अनेकांचा हिरमोड 

गणेश पांडे

परभणी : तब्बल दोन महिण्याच्या प्रदिर्घ कालावधीनंतर जिल्ह्यात मद्य विक्रीस परवानगी देण्यात आली. परंतू ज्या मद्य शौकिनांनी ऑनलाईन नोंदणी केली अश्यानाच मद्याची मंगळवारपासून विक्री करण्यात आली. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केली नाही अश्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.

कोरोना विषाणु संसर्गामुळे टाळेबंदी करण्यात आली आहे. या टाळेबंदीत मागील दोन महिण्यापासून जिल्ह्यात मद्य विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. मद्य विक्री बंद असल्याने मद्य शौकिनांची अत्यंत निराशा झाली होती. त्यामुळे या दोन महिण्याच्या कालावधीत जिल्ह्यात मद्यविक्री बंद असल्याने गावठी दारूचा महापुर आला होता. पोलिसांनी अनेक ठिकाणचे गावठी दारुचे कारखाने उध्वस्थ केले. परंतू जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ऑनलाईन पध्दतीने दारु विक्री करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ता. १७ मेपर्यंत नागरिकांना नोंदणी करण्याचा कालावधी देण्यात आला होता. यावर जिल्ह्यातील ८ हजार ९६  ग्राहकांनी नोंदणी केली असून २७ हजार ५४४ लिटर मद्याची मागणी नोंदविली आहे.

 परवाना नसलेले आघाडीवर
जिल्ह्यात ऑनलाईन लिंकवर मद्याची मागणी करणाऱ्यामध्ये परवाना नसलेले आघाडीवर आहेत. एकूण ७ हजार ९४५ जणांनी विदेशी दारुची मागणी नोंदविली आहे. त्यामध्ये एक हजार १२९ ग्राहक परवानाधारक असून परवाना नसणाऱ्या ग्राहकांची संख्या ६ हजार ९३७ एवढी आहे. त्यामुळे या ग्राहकांना आता घरपोच मद्य पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  जिल्ह्यात एकूण २६ हजार २७६ लिटर विदेशी मद्याची नोंदणी झाली आहे. तसेच ४८३ लिटर बिअर आणि ७८५ लिटर देशी मद्याची नोंदणीही झाली आहे. 

मद्य विक्री दुकानासमोर सकाळपासूनच गर्दी
मद्य विक्री सुरु झाल्याचे समजताच मद्य विक्री दुकानासमोर लोकांची गर्दी जमा झाली. परंतू दुकानमालकानी नोंदणी करणाऱ्या ग्राहकांनाच मद्य दिले जाणार असल्याचे जाहीर केल्याने अनेकांचा हिरमोड झाला. जवळपास सर्वच दुकानसमोर देशी दारु साठी शिल्लक नाही असे फलक लावण्यात आले होते. त्यामुळेही अनेकांना रिकाम्या हातानेच परतावे लागले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT