OBC Reservation News esakal
मराठवाडा

Osmanabad | तुळजापुरात ओबीसी आरक्षणासाठी राज्यव्यापी रथयात्रेस प्रारंभ

ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापूर येथून रथयात्रा निघाली

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद ) : ओबीसी आरक्षणासाठी ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने राज्यव्यापी रथयात्रेस मंगळवारी (ता.पाच) येथे प्रारंभ झाला. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मागणीसाठी तुळजापूर (Tuljapur) ते मुंबई रथयात्रा निघालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रथयात्रा तुळजाभवानी मंदिराजवळ आली. तुळजाभवानी मातेच्या महाद्वारात यावेळी आरती करण्यात आली. त्यानंतर सवाद्य मिरवणुकीने यात्रेचा प्रारंभ झाला. त्यानंतर यात्रा राज्यभर फिरणार आहे. (State Laval OBC Rath Yatra Starts From Tuljapur)

यावेळी ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर, मारूती रोकडे, निलंगा नगरपरिषदेचे सभापती शरद पेठकर, उस्मानाबाद ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी, लोहारा नगरपरिषद नगरसेवक अविनाश माळी, सावता परिषद जिल्हा उपाध्यक्ष महादेव माळी, ज्योती क्रांती परिषद पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अतुल क्षीरसागर, प्रदेश प्रवक्ते शिलवंत क्षीरसागर, उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष महेश माळी, कार्याध्यक्ष लोमेश काळे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष विकी घुगे, बाळासाहेब चिकलकर, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, बाळू भाले, संजय शितोळे, तुळजापूर तालुकाध्यक्ष नितिन माळी, कार्याध्यक्ष महेश म्हेत्रे, नागनाथ म्हेत्रे, धनाजी म्हेत्रे, सोमा माळी, सागर अष्टुळ, बाळासाहेब माळी, सुलतान पटेल, श्रीकांत गाढवे, सिद्धार्थ एकमल्ले आदी उपस्थित होते.

ओबीसींचे आरक्षण जाणे ही दुर्दैवी बाब आहे. पशुपक्षाची जनगणना होते. मात्र ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाही. ही दुर्दैवी बाब आहे. ओबीसींची जनगणना झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार वेळकाढूपणा करीत आहे.

- रमेश बारसकर , प्रदेशाध्यक्ष, ज्योती क्रांती परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT