sagroli 2 
मराठवाडा

वादळी वारा अन् पावसाने पिके आडवी... शेतकरी हताश

अभिजीत महाजन

सगरोळी ः महाराष्ट्र व तेलंगणा सीमावर्ती भागातील बिलोलीसह, धर्माबाद, नायगांव व देगलूर तालुक्यात रविवारी (ता.आठ) रोजी दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने ज्वारी, मक्का, भातपीक, हरबरा, करडई, गव्हू, आंबा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सीमावर्ती पट्यात रविवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक ढगांनी गर्दी केली व वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. सुमारे अर्धातास वारा व संततधार चालू होती. वारा व पावसाचा जोर अधिक असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाताशी आलेले ज्वारी पीक संपूर्णत: आडवे पडल्याने नष्ट झाले. परिसरात हरबऱ्याची काढणी अंतिम टप्यात होती. ज्या शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली त्यांचा हरबरा शेतातच उभा होता, या पावसाने काढणीला आलेले हे पीक पूर्णत: उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. जवळपास पंच्याहत्तर टक्के हरबरा पिकाची काढणी झाली आहे, परंतू, उर्वरित पंचवीस टक्के शेतकऱ्यांना मोठा फटका असला आहे.

शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट
ज्वारी व मक्याचे नुकसान झाल्याने चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होणार असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे टाकले आहे. सीमावर्ती भागात विशेषत: सगरोळी परिसरात मांजरा नदी पट्यात भातपीक आहे. या पावसामुळे भातपीक पूर्णत: आडवे झाल्याने या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे.


पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा
ऐन मोसमात आंब्याला आलेला मोहर पूर्णत: नष्ट झाला असून या भागात असलेल्या अनेक आंब्याच्या बागा व शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटास सामोरे जावे लागले. ज्वारी, भातपीक, हरबरा, करडई, मक्का व गव्हू यातील काही पीके काढणीस आली होती तर काही पुढील पंधरा ते वीस दिवसांत काढणी सुरू होणार होती. यामुळे ह्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करावेत व नुकसान भरपाईसाठी अहवाल शासनाकडे पाठवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांच्या मंगल कार्यालयावर विर्जन
शेतात उभे असलेल्या पिकांवर अनेक शेतकऱ्यांनी घरातील मंगल कार्यालयाचे नियोजन केले होते. ह्या उन्हाळ्यात कुणाच्या घरी मुलींचे तर कुणाच्या घरी मुलाचे मंगल कार्य शेतकऱ्यांनी आयोजिले होते. परंतू ह्या पावसामुळे शेतातील उभी पिके नष्ट झाल्याने पुर्णत: आर्थिक नियोजन फिस्कटल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर व मंगल कार्यालयावर विर्जन घातल्या गेले आहे. देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत केली जाणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी; भोंगवली सबस्टेशनविरोधात कापूरहोळमध्ये रास्ता रोको, ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह ग्रामस्थ रस्त्यावर

Dhamangaon Farmer Case: संसाराचा गाडा हाकणारा आधारवड कोलमडला; ५२ वर्षीय शेतकऱ्याची कर्जबाजारीपणातून जीवन संपवलं

Google वर एक स्टार रिव्ह्यू; कंपनीने महिलेवरच दाखल केला मानहानीचा दावा... काय आहे प्रकरण?

Marathi News Live Updates : मोदी सरकारच्या १२ वर्षात मृत्यू स्वस्त झाला; संजय राऊत यांचा घणाघात

Rahul Gandhi Shirt Shoes Brand : राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमानंतर शर्ट-शूजची चर्चा; ब्रँड कोणता, किंमत किती? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT