file photo
file photo 
मराठवाडा

नांदेडला महाविकास आघाडीची रणनीती

नवनाथ येवले

नांदेड: जिल्ह्यातील सत्ताकेंद्रांचे बुरुज शाबीत राखण्यासाठी महाविकास आघाडीने रणनीती आखली आहे. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवार (ता.तीन) पासून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण जिल्हा दौऱ्यावर आहेत. राज्याप्रमाणे जिल्ह्यातही भाजपला सत्तेपसून रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी सायंकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आदी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतील पदाधिकारी व पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या शिलेदारांना आयोजी बैठकीत कानमंत्र दिला.

राज्यात महाविकास आघडीचे पर्व उदयास आल्याने जिल्हास्तरावर कधी काळी एकमेकांना पाण्यात पाहणारे विरोधक एका छताखाली आले आहेत. मंत्रीमंडळ विस्तारानंतर महाविकास आघाडीने जिल्हास्तरावरील सत्ताकेंद्रांकडे मोर्चा वळवला असून राज्यातील जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांची सत्ता काबीज करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. आगामी काळात होवू घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभुमिवर मंत्री श्री. चव्हाण यांनी विश्रामगृहामध्ये महाविकास आघाडीच्या शिलेदारांचा आढावा घेतला. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार श्यामसुंदर शिंदे, मोहन हंबर्डे, रावसाहेब आंतापुरकर, माधवराव जवळगांवकर, अमर राजुरकर, बालाजी कल्याणकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार सुभाष साबणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल कदम, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर, रिपाई (कवाडे गट) चे बापुराव गजभारे यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

सत्तांतराची चाचपणी 
महापालिका, जिल्हा परिषदेसह एकूण सोळा पंचायत समित्यांपैकी आठ पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या ताब्यात चार पंचायत समित्या आहेत. शिवसेनेच्या दोन पंचायत समितीपैकी एक खासदार प्रताप पाटील चिखलीकर समर्थकांच्या ताब्यात आहे. भाजपाचा घटकपक्ष असलेल्या रासपच्या ताब्यातही एक पंचायत समिती आहे. जाहिर झालेल्या आरक्षण प्रणालीनुसार पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीतर्फे सत्तांतराची चाचपणी करण्यात येत आहे.  

येथे क्लिक करा...‘या’ महापालिकेचे फेरीवाला धोरण कागदावरच
 
समन्वयाचा कानमंत्र 
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसह पंचायत समित्यांच्या सभापती निवडीमध्ये महाविकास आघाडीच्या यशस्वीतेसाठी कामाला लागण्याचा कानमंत्र देत राज्याप्रमाणे जिल्ह्यातही भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी समन्वय समिती गठीत करुन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सत्ताकेंद्राच्या माध्यमातून विकास साधण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. जाहिर झालेल्या आरक्षणानुसार महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसह पंचायत समिती सभापती निवडीबाबत शिलेदांराना त्यांनी समन्वयाचा कानमंत्र दिला. 

पंचायत समितीत सत्ताधारीपक्ष (सद्यस्थिती)
काँग्रेस : नांदेड, अर्धापुर, मुदखेड, भोकर, हदगाव, हिमायतनगर, देगलूर, नायगाव 
भाजपा : किनवट, धर्माबाद, बिलोली, मुखेड
शिवसेना : लोहा(चिखलीकर समर्थक), माहूर
राष्ट्रवादी: उमरी
रासप : कंधार     

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT