file photo 
मराठवाडा

रक्षकच भक्षक : पोलिसानीच काढली विद्यार्थिनीची छेड 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : पोलिसांच्या गस्तीमुळे शहर व जिल्ह्यातील महिला आणि विद्यार्थीनी निर्भयपणे वावरत असतात. परंतु विद्यापीठात गेलेल्या एका विद्यार्थीनीची छेड चक्क एका पोलिसांनी काढली. मात्र सजग विद्यार्थीनीमुळे छेड काढणाऱ्या पोलिसाला अन्य विद्यार्थी व नागरिकांच्या मदतीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात रविवारी (ता. १५) दुपारी घडली. यामुळे रक्षकच भक्षक झाले तर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. छेड काढणाऱ्या पोलिसांवर नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
महाविद्यालयीन तरुणीची छेड काढणारा कर्मचारी हा भाग्यनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. सदरच्या  कर्मचाऱ्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्षकच भक्षक झाल्याने विश्वास कोणावर ठेवायचा अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तर निर्भया वॉक काढून जनजागृती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस दलाची लक्तरे वेशीला टांगल्या गेली आहे.

छेड काढणारा पोलिस नितीन केंद्रे

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील एका विद्यार्थिनीची प्रकृती ठीक नसल्याने ती शासकिय रुग्णालयात जाण्यासाठी एका मैत्रीणीसह ॲटोतून निघाली होती. ती दवाखान्यात जात असताना भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नितीन केंद्रे यांनी सदर विद्यार्थिनीची आधी फ्लाईंग किस देत छेद काढली. त्यानंतर तिचा रस्ता रोखून धरला. तिच्याशी चाळे करत उद्धट वर्तन केले. यावेळी विद्यार्थीनीनी आरडाओरडा केला. 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट 

हा प्रकार लक्षात आल्यानंतर अन्य विद्यार्थ्यांनी धाव घेतली. घटनेची माहिती कळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. ग्रामीण पोलिसांकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दमदाटी करणे, मारहाण करणे त्यांना पोलीस व्हॅनमध्ये कोंबून ठाण्यापर्यंत आणणे असी वागणूक पोलिसांकडून दिल्या जाते मात्र हा गंभीर प्रकार घडल्यानंतरही छेड काढणाऱ्या पोलिसाला विचारपुस करणय्त येत होती. कायद्याचे रक्षकच भक्षक बनत असल्याने न्याय कुणाकडे मागायचा? रक्षणाची जबाबदारी कोणावर टाकायची? असा सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT