Lohara Crime News 
मराठवाडा

शिक्षण सोडून दुसरेच उद्योग, विद्यार्थ्यांच्या दोन गटांत सिनेस्टाईल हाणामारी

नीळकंठ कांबळे

लोहारा(जि.उस्मानाबाद) : शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दोन गटात गुरूवारी (ता.२५) सिनेस्टाईल हाणामारी झाली. यात दोघे किरकोळ जखमी झाले. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून सोडून दिले. परंतु मागील काही वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडत असल्याने पालकांत चिंतेचे वातावरण आहे. येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात शहरासह परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. बुधवारी (ता.२४) करजखेडा (ता.उस्मानाबद) व बेंडकाळ येथील विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयीन वेळेत किरकोळ कारणावरून शाब्दीक बाचाबाची झाली. हे प्रकरण निवळले असताना गुरूवारी (ता.२५) सकाळी नऊच्या सुमारास करजखेडा येथील विद्यार्थ्यांनी गावातील काही टवाळखोर युवकांना बोलावून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर कुरापत काढली.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दोन गटांत सिनेस्टाईल हाणामारी सुरू झाली. प्राध्यापकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिस घटनास्थळी येऊन हस्तक्षेप करीत विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. झालेल्या हाणामारीत दोघे किरकोळ जखमी झाले. दरम्यान,  पोलिसांनी दोन्ही गटातील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून पुन्हा भांडणे करणार नसल्याचे कबूल करून घेतले. शहरात दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने तालुक्याबाहेरील विद्यार्थी मोठ्या संख्येने महाविद्यालयात प्रवेश घेतात. यात विद्यार्थीनींची संख्या अधिक आहे. त्यामुळे काही टवाळखोर विद्यार्थ्यांकडून मुलींची छेड काढली जाते.

परगावाहून ये-जा करणाऱ्या विद्यार्थीनींना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. महाविद्यालय सुटल्यानंतर शहरातील बसस्थानकामध्ये विद्यार्थीनींची मोठी गर्दी असते. काही टवाळखोर विद्यार्थी बसस्थानक परिसरात वाढदिवस साजरा करणे, गोंधळ घालणे असे प्रकार करून विद्यार्थीनींची छेड काढतात. या प्रकारामुळे विद्यार्थीनी त्रस्त झाल्या आहेत. छेड काढल्याचे सांगितल्यावर शिक्षण बंद होईल. या भीतीपोटी मुली कोणतीच तक्रार न करता निमुटपणे त्रास सहन करीत आहेत. छेडछाडीवरून अनेक वेळा विद्यार्थ्यामध्ये हाणामाऱ्याच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी वेळीच टवाळखोर, रोडरोमिओच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT