biloli nukasa.jpg
biloli nukasa.jpg 
मराठवाडा

Video : आधीच ‘कोरोना’, त्यात अवकाळीने दैना !

विठ्ठल चंदनकर


बिलोली, (जि. नांदेड) ः शहर व परिसरात सोमवारी (ता. २०) रात्री साडेनऊच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी विजेच्या खांबांसह तारा तुटल्या असून बरीच टीनशेडची घरे, दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहर व परिसरात शंभरपेक्षा अधिक ठिकाणी झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत.

बिलोली तहसील कार्यालयाच्या प्रांगणातील दोन निलगिरीची व अन्य दोन, अशी चार झाडे मुळासकट तुटून पडले आहेत. तहसील कार्यालयाच्या परिसरात अवैध वाळू तस्करी करणारे ट्रक, ट्रॅक्टर उभे आहेत. त्यातील एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर झाड पडल्याने ट्रॅक्टरचे नुकसान झाले आहे. या ठिकाणीच तहसीलदारांचे व उपजिल्हाधिकाऱ्यांची शासकीय वाहने उभी होती. मात्र, त्यांचे नुकसान टळले आहे. पोलिस ठाण्यातील तीन झाडे तुटून पडले आहेत. जिल्हासत्र न्यायालयाच्या परिसरातही काही झाडे उन्मळून पडले आहेत.

शहरातील झोपडपट्टी भागातील टीनशेडच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत. त्यामुळे अशा लोकांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. शहराच्या बाजारपेठेतील मुख्य रस्त्यालगतच्या टीनशेडच्या झेरॉक्स सेंटर, ईडली सेंटर, चहा-फराळाची दुकाने, चप्पलांच्या दुकानांसह अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. बिलोली शहरातील गांधीनगरसह अमोलनगर, देशमुखनगर, नवीन आबादी भागात व मुख्य शहरात विजेचे खांब व तारा तुटून पडल्या आहेत. त्यामुळे सोमवारी रात्रीपासूनच शहरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. बिलोली परिसरातील विजयनगर, दगडापूर आदी भागातही विजेची खांबे तुटून पडल्यामुळे किमान दोन दिवस तरी शहर व परिसरात विजेची समस्या निर्माण होणार आहे.

वीज गेल्याने पाण्याचे भाव वाढले
शहरात फ्लोराईडयुक्त पाणी असल्यामुळे प्रत्येक घरातील नागरिक वॉटर क्युरिफायरचे पाणी वापरत आहेत. वादळी वाऱ्यामुळे वीज गायब झाल्याचे समजताच अनेक पाणी विक्रेत्यांनी दहा रुपयांची पाणी बॉटल वीस ते पंचवीस रुपयांत विक्री करीत आहेत. वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या भागात नगराध्यक्षांचे पती व माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, नितीन देशमुख, अमजद चाऊस, वलियोद्दीन फारूकी, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शेख सुलेमान आदींनी व काही नगरसेवकांनी पाहणी केली. तद्‍नंतर त्यांनी तहसीलदारांची भेट घेतली. वादळी वाऱ्यामुळे शहरातील ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या घरी जाऊन पंचनामे करून त्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT