घनसावंगी (जि.जालना) :  ऊस वाहतुकदार संघटनेच्या वतीने नवीन बसस्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढून विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
घनसावंगी (जि.जालना) : ऊस वाहतुकदार संघटनेच्या वतीने नवीन बसस्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढून विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.  Sugar Cane Transporters Association Tractor March In Ghansawangi
मराठवाडा

घनसावंगीत ऊस वाहतूकदारांचा ट्रॅक्टर मोर्चा,दर वाढवण्याची मागणी

सुभाष बिडे

घनसावंगी (जि.जालना) : ऊसवाहतुकीचे दर आणि कमिशन वाढवून मिळवून देण्यात यावे, या मागणी करिता ऊस वाहतूकदार संघटनेच्या (Sugar Cane Transporter Association) वतीने संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांच्या नेतृत्वाखाली घनसावंगी येथे सोमवारी (ता.चार) नवीन बसस्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढून मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांची (Ghansawangi) दरवाढ झाली नाही. तीन वर्षाला ऊसतोडणी भाववाढ केली नाही, तर ऊसतोडणीधारक संप करतात. त्या धर्तीवर ऊस वाहतूकदारांना तीन वर्षाला दरवाढ (टायर किंमत, ड्रायव्हर पगार, कोयता मजूर) यांची झालेली वाढ (Jalna) यांचा विचार करता डिझेल दर गेल्या पाच वर्षापूर्वी 64 रूपये इतका होता. आता शंभर रूपयाच्या आसपास झालेला आहे. डिझेलच्या पटीत पन्नास टक्के दरवाढ झाली पाहिजे. परंतू ट्रक व ट्रॅक्टरच्या वाढलेल्या किंमती आणि वरील सर्व गोष्टींचा विचार करीता पन्नास टक्के दरवाढ झाली पाहिजे.

कारखाना शेतकर्‍यांचा आहे. आणि शेतकरी कारखान्यांचे आहेत. तसेच ऊस वाहतूकदार ही शेतकर्‍यांची पोरं आहेत. शेतकरी आणि ऊस वाहतूकदार वेगळी नाहीत, म्हणून कारखान्यांनी वाढलेल्या कोयत्यांचा मजूर दर पाहता कमीत-कमी 75 टक्के ( अंदाजे दहा लाख ) रूपये अ‍ॅडव्हान्स म्हणून द्यावी व सदर रक्कम ही दोन टप्प्यात द्यावी. ऊस वाहतूक दरांचा करार केल्यानंतर अ‍ॅडव्हान्स देण्याच्या अगोदर त्यांच्या ट्रॅक्टर व ट्रक चांगल्या कंडिशनमध्ये असल्याचे चेक केले जाते. त्यांची टोळी आहे का ते त्या ठिाकणी जावून चेक करून प्रत्येक मजूरांचे आधारकार्ड यासह इतर कागद पेपर घेतले जाते. त्या नंतर वाहनमालकांना अ‍ॅडव्हान्सचा पहिला हप्ता दिला. यामध्ये सुधारणा करून वाहतूकदारांनाही कारखान्यांनी सहकार्य करावे, असे निवेदनात म्हटले आहे. ऊसतोड वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष अतूल खुपसे यांनी तहसीलदार नरेंद्र देशमुख यांना मागण्याचे निवेदन दिले. यावेळी कृष्णा पवार यांच्यासह ऊसतोड वाहतूकदार मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT