तीर्थपुरी: पालावर जाऊन गरजवंताना साहित्य वाटपासह भोजनाचे पाकीट देताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार.  
मराठवाडा

गरजूंना वाणसामानासह दोन वेळचे जेवण 

तुकाराम शिंदे

तीर्थपुरी (जि.जालना) -  कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे गोरगरिबांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गरजूंना दोन वेळचे जेवण व किराणा साहित्याच्या किटची व्यवस्था जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार यांच्या वतीने करण्यात आली आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. गावात व परिसरात कोरोना या विषाणूच्या भीतीमुळे लोक घराच्या बाहेर येत नाहीत; परंतु गोरगरिबांच्या हाताला काम नाही अशांना दोन वेळच्या जेवणाची चिंता लागली आहे.

त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने या ग्रामस्थांना आधार देण्यासाठी दोन वेळचे जेवण व किराणा साहित्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परिसरातील गावातील गरजवंतांची नावे गावकऱ्यांनी द्यावीत असे आवाहन करण्यात आले.

तीर्थपुरी व परिसरातील गरजवंतांना दोन वेळचे जेवण व आठ दिवस पुरेल एवढे किराणा साहित्य घरपोच देण्यात येत आहे.  

पालावर जाऊन भोजनाचे पाकीट वाटप

तीर्थपुरी परिसरातील पालावर जाऊन जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र पवार यांच्या वतीने गुरुवारी (ता.२) साहित्य वाटपासह भोजनाचे पाकीट देण्यात आले. 
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्रीकृष्‍ण बोबडे, मेहेरनाथ बोबडे, नारायण बोबडे, मुख्याध्यापक सुनील अंभोरे, ग्रामविकास अधिकारी गजानन मुपडे, गणेश शिंदे, रंगनाथ मोरे,जनार्दन बारवकर, रमेश बोबडे हे उपस्थित होते. यावेळी महेंद्र पवार यांच्याहस्ते गरजूंना त्यांच्या घरपोच जाऊन आठ दिवस पुरेल इतका किराणा साहित्य व दोन वेळेचे जेवण देण्यात आले आहे. 

गोरगरीब, कष्टकऱ्यांच्या हाताला काम नाही. या भागातील अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याचे लक्षात आले. त्यामुळे गरजूंना तत्काळ आठ दिवस पुरेल एवढं किराणा सहित्य व दोन वेळेस जेवण घरपोच स्वखर्चातून देण्यात येत आहे. अशा उपक्रमात परिसरातील लोकप्रतिनिधी पुढे आले पाहिजे. 
- महेंद्र पवार, 
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद जालना. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : शेती उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT