फोटो 
मराठवाडा

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अनेक कुटुंबांना आधार

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या रोजमजुरांसह अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत गोरगरिबांच्या मदतीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागही सरसावला आहे. या विभागाकडून तब्वबल अडीच हजार गरीब कुटुंबांना धान्य वाटप केले. त्यांच्याही खाकीला मायेचा पाझर फुटला. चार सदस्य असलेल्या प्रत्येक कुटुंबाला एक महिना पुरेल इतके धान्य देण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांच्या सूचनेनुसार हे धान्य जिल्हा प्रशासनाच्या वतीने वाटप करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन करण्यात आले. परिणामी असंख्य गरीब व मजुरदारांवर लोकांवर उपासमारीची वेळ ओढवली. गोरगरीब जनतेला काम मिळत नसल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशा परिस्थितीत गोरगरिबांना शासनाकडून धान्य पुरविण्यात येणार असले तरीही तुर्तास अनेक सामाजिक संस्था आणि दात्याकडून मदत सुरू आहे. 

तब्बल अडीच हजार कुटुंबांना हे धान्य वाटप करण्यात येणार

सामाजिक दायित्वाचा एक भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने निधी संकलित करून दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणारे अन्नधान्य शहरातील अडीच हजार गरीब कुटुंबाला पुरविण्यात येत आहे. तब्बल अडीच हजार कुटुंबांना हे धान्य वाटप करण्यात येणार असून अन्य सामाजिक संस्था आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी गोरगरिबांना अन्नधान्य पुरविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यउत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांनी केले आहे.  

जाणीवपुर्वक गर्दी करणाऱ्यां विशिष्ट समुहावर कारवाई करावी

नांदेड : कोरोना विषाणुपासून बचावाचा एकमेव मार्ग म्हणजे गर्दी टाळणे असे असतांनाही काही विशिष्ट लोक जाणीवपुर्वक गर्दी करुन संचारबंदीला गालबोट लावत शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत. अशा विशिष्ट समुहाच्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांची मागणी

कोरोना विषाणुपासून बचावासाठी गर्दी टाळणे हा प्रमुख उपाय असल्याने देशभरात ता. १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देखील मिळत आहे. परंतु काही विशिष्ट समुहाचे लोक जाणीवपुर्वक गर्दी करत असून या समुहामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. या विशिष्ट समुहामुळे संपुर्ण शहराला धोका होण्याचे शक्यता असून यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse: मोशी कचरा डेपो दुर्घटना! ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी सांगितला थरारक अनुभव, Video पाहा

हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? पाच महिन्यांत ३१३ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, सर्वाधिक संख्या यवतमाळमध्ये...

Latest Marathi News Live Update : शिवसेना पक्ष सोडून दुसऱ्या गटात गेलेल्या खासदारांबाबत निर्णय घेण्यासच सर्वोच्च न्यायालयाने चार वर्षे लावली - अरविंद सावंत

Pune : भरतीत जास्त गुण मिळवून देतो, आमिष दाखवत अत्याचार; महिलेचे PSIसह पोलीस कॉन्स्टेबलवर गंभीर आरोप, गुन्हा दाखल

पावसाच्या सरींमध्ये चिंब भिजणार तारिणी आणि केदार; तीन तास सुरू होतं शूट मालिकेचं शूट; म्हणते- मी पहिल्यांदाच...

SCROLL FOR NEXT