police
police police
मराठवाडा

जालन्यातील 'त्या' पाच पोलिसांचे निलंबन मागे

सकाळ वृत्तसेवा

जालना: केंद्रीय राज्यमंत्री रावसावहेब दानवे (raosaheb danve) यांच्या जाफराबाद येथील संपर्क कार्यालयाची पूर्व परवानगी न घेतला झाडाझडीत घेतल्या प्रकरणी निलंबित केलेल्या पाच पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. ही माहिती अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी शनिवारी (ता.१९) दिली. जाफराबाद येथे एका पत्रकारावर वाळू माफियांनी हल्ला केला होता. त्यानंतर जाफराबाद पोलिसांना या हल्ल्यातील काही संशयित एका राजकीय नेत्याच्या संपर्क कार्यालयात असल्याची माहिती मिळाली होती.

मात्र, या संदर्भात वरिष्ठांना माहिती न देता, तसेच पूर्व परवानगी न घेता जाफराबाद पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जाफराबाद येथील केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या संपर्क कार्यालयाची झाडाझडती घेतली. या प्रकरणी पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तक्रार केल्यानंतर पोलिस अधीक्षक श्री. देशमुख यांनी चौकशीनंतर पोलिस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलिस उपनिरीक्षक युवराज पोठरे, पोलिस कर्मचारी मंगलसिंग सोळंके, सचिन तिडके, शाबान तडवी यांना ता.१४ जुन रोजी निलंबित केले.

मात्र, यात पोलिसांची काहीच चुक नसताना निलंबानाची कारवाई करण्यात आली असून ही निलंबानाची कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची तीन दिवसांपूर्वी मुंबई येथे भेट घेवून केली होती. यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे ही त्यांच्यासोबत होते. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या संपर्क कार्यालयाची झाडाझडती घेतल्या प्रकरणी निलंबित केलेल्या पोलिस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलिस उपनिरीक्षक युवराज पोठरे, पोलिस कर्मचारी मंगलसिंग सोळंके, सचिन तिडके, शाबान तडवी यांचे निलंबन शनिवारी (ता.१९) मागे घेण्यात आल्याचे अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT