sakal
मराठवाडा

निलंगा : नदीकाठच्या तीस गावात तलाठी, ग्रामसेवक मुक्कामी

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज तहसीलदार गणेश जाधव यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

निलंगा : गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्प भरले असून मांजरा व तेरणा नदीला मोठा पूर आला असून या दोन्ही नद्यांच्या काठावरील तीस गावात तलाठी व ग्रामसेवक मुक्कामी राहणार आहेत. शिवाय मांजरा व तेरणा काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहीती तहसीलदार गणेश जाधव यांनी मंगळवारी ता. 28 रोजी दिली.

सतत पडत असलेल्या पावसामुळे धनेगाव ता. केज येथील धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून यातून सत्तर हजार 800 क्युसेस पाण्याचा विसर्ग मांजरा नदीपात्रात होत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले असून त्यामध्ये मसलगा मध्यम प्रकल्पाचेही दोन दरवाजे उघडण्यात आली आहेत. त्यामुळे मांजरा नदीपात्रात अधिक पाण्याची भर पडली आहे. या नदीकाठच्या 13 गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हालसी-तुगाव व चिचोंडी गावांना धोका होण्याची शक्यता असल्यामुळे कांही कुटूंब पाण्याचा प्रवाह वाढल्यास हलवावे लागणार आहेत. बसपूर-बाकली या पूलावरून पाणी पडत असल्यामुळे हा रस्ता बंद वाहतुकीला करण्यात आला आहे. तर मसलगा ता. निलंगा येथीलही महामार्गावरील वाहतुक पाऊस सुरू राहील्यास बंद करावी लागणार आहे. तर तेरणा नदीपात्रात माकणी ता. लोहारा येथील धरणाचे पाणी सोडण्यात आले असून या नदीकाठच्या 17 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या नदीवरील चांदोरी व गुंजरगा या दोन गावाना पाण्याच्या अतिप्रवाह वाढल्यास धोका होणार आहे. शिवाय सावरी ते मानेजवळगा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी 24 तास कंन्ट्रोल रूमची स्थापना येथील तहसील कार्यालयात करण्यात आली असून नदीकाठच्या तिस गावातील पाण्याच्या माहीतीसाठी ग्रामसेवक, तलाठी मुक्कामी राहणार आहेत.

जिल्हापरिषद शाळेच्या मुख्याद्यापकांना नागरिकांना ऐनवेळी सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी उघड्या ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्यासाठी आदेश देण्यात आल्याचे गटविकास आधिकारी अमोल ताकभाते यांनी दिले आहेत. यंदा पावासाने सरासरी ओलांडली असून पूर ओसरल्यानंतर नदीकाठच्या गावातील शेतीपीकाचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहाय्यक यांच्याकडून केले जाणार आहेत. या नैसर्गिक आपत्तीत हलगर्जीपणा करणाऱ्या आधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT