teachers on sick leave to skip election work Aurangabad district
teachers on sick leave to skip election work Aurangabad district 
मराठवाडा

Vidhan Sabha 2019 : प्रशासकीय कामे टाळण्यासाठी कामचुकार शिक्षक आजारी रजेवर 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा ज्वर शिगेला पोचला आहे. ही निवडणूक सुरळीत पार पाडावी, यासाठी प्रसासनही कामाला लागले आहे. त्या अनुषंगाने शिक्षकांवरही निवडणूक कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, सध्या शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू आहेत. त्यातच निवडणुकीचे अतिरिक्त काम आले आहे. त्यामुळे दुहेरी कामांचा ताण कमी करण्यासाठी आजारपण नसतानाही काही शिक्षक आजारी रजेवर गेले आहेत. परिणामी, कमी मनुष्यबळात शाळांना परीक्षा घ्यावी लागत आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना निवडणुकीचे कामे देण्यात आली आहेत. रोज शाळेत ज्ञानार्जनाचे काम केल्यानंतर वेळेनुसार निवडणुकीचे कामे करायची आहेत; मात्र या कामापासून मुक्ती मिळावी म्हणून जिल्ह्यातील अनेक शिक्षक विविध कारणे सांगून रजा घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. जुलैच्या सुरवातीपासूनच शिक्षकांना निवडणुकीसंदर्भातील कामे लावण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना पत्र देण्यात आले होते. सध्या शाळेत सहामाही परीक्षा सुरू आहेत. बहुतांश शिक्षक कर्मचारी हे निवडणुकीच्या कामामुळे शाळेत येत नाहीत. त्यातच निवडणुकीची कामे मिळू नये म्हणून अगोदरच अनेक शिक्षक, कर्मचाऱ्यांनी रजा घेतली आहे. त्यामुळे शाळांना अत्यल्प शिक्षकांवर विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागत आहे. 

निवडणूक काळात हजारो शिक्षक अनेक दुर्गम भागात जाऊन कर्तव्य बजावतात. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यानंतर जनगणना होणार आहे. त्यामुळे निवडणुकीची कामे केल्यानंतर शिक्षकांना जनगणनेची कामेही करावी लागणार आहेत. जनगणनेच्या कामांसाठी शिक्षकांव्यतिरिक्त शासनाने अन्य सरकारी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा विचार करावा, शिक्षकांना ज्ञानार्जनाचे काम करून द्यावे अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. 

शिक्षकांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार - 
एक ते तीन - मुख्याध्यापक 
एक ते पाच - विस्तार अधिकारी 
एक ते 59 - गटशिक्षणाधिकारी 
एक ते 120 - शिक्षणाधिकारी 
एक ते 180 - मुख्य कार्यकारी अधिकारी 
एक ते 240 - विभागीय आयुक्त 
त्यापेक्षा जास्त रजा हवी असल्यास मंत्रिमंडळाचे राज्यसचिवांची परवानगी घ्यावी लागते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT