file photo 
मराठवाडा

शिक्षकांचे निलंबन, केंद्रप्रमुखांसह चौघांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा

परभणी : अध्ययन निष्पतीमध्ये चुकीची माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी दिग्रस खुर्द (ता. सेलू) येथील तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले. दिग्रस बुद्रुक येथील तीन शिक्षकांसह सेलूच्या केंद्रप्रमुखांना या प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केली आहे.

जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात बदल करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अध्ययन निष्पत्ती नैदानिक चाचणी सुरू केली आहे. त्यासाठी श्री. पृथ्वीराज यांनी मागील काही महिन्यांपासून पुढाकार घेत सातत्याने शिक्षण परिषदांच्या माध्यमातून अध्ययन निष्पती चाचणीवर भर देत शाळांची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत सेलू येथील साई नाट्यगृहात बुधवारी (ता. चार) श्री. पृथ्वीराज यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर सर्व जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांची शिक्षण परिषद घेण्यात आली. त्यात शाळांनी अध्ययन निष्पती चाचणीचा अहवाल सादर केला. त्यानंतर अहवालाची प्रत्यक्षात तपासणी करण्यासाठी श्री. पृथ्वीराज यांनी दिग्रस बुद्रुक व दिग्रस खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना भेटी दिल्या.

अध्ययन निष्पती चाचणी दोनचा निकाल चुकीचा
 या भेटी दरम्यान, त्यांना अध्ययन निष्पती चाचणी दोनचा निकाल हा चुकीचा व दिशाभूल करणारा अढळून आला. शिक्षकांनी वस्तुनिष्ठ माहिती लपवून प्रशासनाची दिशाभूल केली म्हणून तेथील तीन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस श्री. पृथ्वीराज यांनी बजावली आहे. तर दिग्रस खुर्द येथेदेखील भेट देऊन पाहणी केली असता त्यांना अहवालाच्या निकालात मोठी तफावत आढळून आली. अशा प्रकारे चुकीची माहिती देणे, निकाल जाणीवपूर्वक वाढवून दाखविणे, प्रत्यक्षात गुणवत्तेच्या बाबतीत व्यवस्थित काम न केल्याचे आढळून आल्याने तेथील तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. तर सेलू केंद्रप्रमुखांना या दोन्ही प्रकारांबाबत हलगर्जीपणाचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस दिली आहे. श्री. पृथ्वीराज यांनी केलेल्या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा व पहा - Video : पाहा...कठाळ्यांच्या झुंजीने परभणीत काय झाले


खासगी शाळांचे काय ?
खासगी शाळांमध्ये अध्ययन निष्पत्ती चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांनी अपेक्षित गुणवत्ता प्राप्त केली की नाही हे तपासण्याचे काम तेथील मुख्याध्यापकांचे असते. खासगी शाळांमधील सर्वच विद्यार्थी हुशार असतात, असा गैरसमज निर्माण झालेला असून अनेक शाळांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. जिल्हा परिषदेने आपल्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे खासगी शाळांचे मुख्याध्यापक अध्ययन निष्पत्ती चाचण्या घेऊन त्याची तपासणी करणार का ? तसेच विद्यार्थ्यांनी अपेक्षित गुणवत्ता प्राप्त न केल्यास संबंधितांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या प्रकरणी शिक्षणाधिकारी कार्यालयाची भूमिकादेखील महत्त्वाची ठरणार आहे.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Asian Games: भारतीय खेळाडूंचे दणादण गोल! हॉकीमध्ये पहिल्या सामन्यात पुरुष व महिला संघांची धडाकेबाज विजयी सलामी

SCROLL FOR NEXT