file photo 
मराठवाडा

परभणीत तापमानाने गाठली चाळीशी

कैलास चव्हाण

परभणी : सतत ढगाळ वातावरणामुळे नाहीसा झालेला उष्णतेचा कडाका सुरु झाला आहे. परभणी जिल्ह्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली असून  उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. रविवारी (ता.१२) तापमान ४० अंशावर राहीले. येत्या काही दिवसात पारा आणखी वाढण्याचा इशारा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने दिला.

यंदा ऋतुचक्र बदलले आहे. पावसाळा संपल्यानंतर पाऊस सुरु झालला होता. हिवाळ्यातदेखील थंडी गायब होऊन अधुनमधुन पाऊस पडत होता. आता आर्धा उन्हाळा संपल्यानंतर तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षी मार्च महिण्याच्या अखेरच्या आठवड्यात तापमान ४२ अंशावर गेले होते. यंदा मात्र, १२ एप्रील रोजी तापमानाने चाळीशी गाठली आहे. दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असूनही पारा वाढला आहे. रविवारी तापमान ४० अंशावर होते. त्यामुळे अंग भाजणारा सुर्यप्रकाश पडत आहे.

उकाडा वाढला
 माणसासोबत प्राणीदेखील हैरान झाले आहेत. उन्हाचा कडाका आणि उकाडा यामुळे सर्वांनाच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सर्वच नागरिक घरात आहेत. त्यामुळे बाहेर उन्हाचा त्रास होत नसला तरी घरात वीजपुरवठा खंडीत होताच प्रचंड उकाडा जाणवत आहे.
कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाअंतर्गत असलेल्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने पुढील पाच दिवसात तापमान आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.


कोट्यवधींची उलाढाल ठप्प
दरवर्षी मार्च महिन्यापासून उन्हाळ्याच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल सुरू होत असते. उन्हापासून बचाव करणाऱ्या साधनांनी बाजारपेठ सजलेली राहाते. बाजारपेठांमध्ये उन्हापासून संरक्षण करणाऱ्या सनगॉगल्स, टोपी, रुमाल आदी वस्तूंची गर्दी होते. याबरोबरच विविध शीतपेयांची दुकाने लागतात, सर्वच रस्त्यांवर रसवंत्या सुरू असतात. कपड्यांसह इलेक्ट्रॉनिक दुकानांतदेखील गर्दी होते. फ्रीज, एअर कूलर, फॅन यांनाही मागणी होऊ लागते. उन्हाळ्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भासते. त्यामुळे पाणी साठवण्यासाठी टाकीची गरज असल्याने सध्या पाण्याच्या टाक्यांचीदेखील विक्री वाढते. अशी एकदंरीत बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल वाढते. यंदा मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन सुरू आहे. त्याचा परिणाम या सर्व गोष्टींवर झाला आहे. उकाडा वाढू लागल्याने पंखे, कूलरची गरज आहे. ज्यांच्याकडे कूलर आहेत, त्यांनी ते सुरू केले आहेत. मात्र, अनेकांचे कूलर नादुरुस्त झालेत. कुणाला नवीन कूलर घ्यायचे, कुणाचा पंखा नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे अनेकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांवर घामाघूम होण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT