Latur Crime News
Latur Crime News 
मराठवाडा

दहा लाखांची रोकड जप्त, उदगीरातील दगडफेक करणाऱ्या आरोपींची धरपकड सुरू

युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : शहरात मंगळवारी (ता.१९) विविध ठिकाणी दगडफेक करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांची धरपकड मोहीम शहर पोलिसांनी सुरू केली आहे. बुधवारी (ता.२०) पाच आरोपींना अटक करण्यात आली. यातील एका आरोपीकडून दहा लाख रुपयाची चलनातून बाद झालेली रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. याबाबत शहर पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मंगळवारी मारहाण झालेल्या एका युवकाचा मृत्यू झाला.

आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह पोलिस ठाण्यात आणून ठेवले. या दरम्यान जमाव जमा झाला. या जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी उदगीरात तळ ठोकून हा तणाव निवळला. शहराची शांतताभंग करणाऱ्या‍वर गुन्हे दाखल केले. पैकी साबेर याहिया पटेल, मुसा बागवान, मिर्झा पाशा बेग, शादुल निजाम शेख,अमीर अब्दुल रज्जाक चाऊस या पाच आरोपींना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीं पैकी एका आरोपीकडे जुन्या चलनी (बंद झालेल्या) एक हजार रुपयाच्या अशा दहा लाखाच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही रोकड सापडल्याने आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असल्याचे दिसून येत आहे. या नोटा बाळगल्याप्रकरणी वेगळा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केला आहे.शहर पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील, व्यंकटराव एडके, सहदेव खेडकर या प्रकरणातील कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT