file photo
file photo 
मराठवाडा

ठाकरे सरकार सोईस्कर मंत्र्यांना पाठीशी घालत आहे- आमदार मेघना बोर्डीकर

गणेश पांडे

परभणी : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संशयित मंत्र्यांना ठाकरे सरकार सोईस्कर रित्या पाठीशी घालत आहे. या प्रकरणी पोलिसांवरील दबाव  कमी करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी (ता. २७) केली.

पुजा चव्हाण हिच्या मृत्यूची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, तसेच वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा तात्काळ घेण्यात यावा, या मागणीसाठी शुक्रवारी (ता.२७) शहरातील वसमत रस्त्यावर भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

वसमत रस्त्यावरील भरोसे पेट्रोलपंपासमोर आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी व्हावी व मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आमदार मेघना बोर्डीकर, भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या जिल्हा महानगराध्यक्षा सुप्रिया कुलकर्णी, नगरसेविका मंगल मुदगलकर, गीता सूर्यवंशी, छाया मोगले, विजया कातकडे, सुशीला डहाळे, वर्षा शिंदे, सारिका धुमाळ, ललिता जाधव यांच्यासह नगरसेवक मधुकर गव्हाणे, संजय रिझवाणी, दिनेश नरवाडकर, गणेश देशमुख, संदीप शिंदे, अनंत गिरी, राजेश देशमुख, संतोष जाधव, अनुप गिरी, संजय रिझवाणी आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. रास्तारोको आंदोलनामुळे दोन्ही बाजुंनी मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT