वसमत पंचायत समिती 
मराठवाडा

वसमत पंचायत समितीमध्ये फुलली 225 झाडांची परसबाग

हिंगोली जिल्ह्यातील वसमत पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सुंदर माझा कार्यालय अभियान अभियानांतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

पंजाब नवघरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुंदर माझं कार्यालयांतर्गत पंचायत समिती कार्यालय (Panchayat samit office wasmat) परिसरामध्ये 225 विविध जातीच्या झाडांची परसबाग फुलवली आहे. तालुक्यातून पंचायत समितीमध्ये येणाऱ्या गावकऱ्यांसाठी ही परसबाग आकर्षण ठरु लागली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सुंदर माझा कार्यालय अभियान अभियानांतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी पंचायत समितीच्या आवारातील वीस गुंठे जागेमध्ये तार कुंपण केले. त्यानंतर या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेवर जवळपास 225 रोपांची लागवड केली. केवळ रोपे लागवड न करता त्या झाडाला दररोज प्रत्येक झाडाला ठिबक सिंचन पद्धतीद्वारे पाणी दिले जात आहे.

हेही वाचा - राज्यसभेचे खासदार तथा गुजरात प्रभारी राजीव सातव यांच्या निधनानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने बुधवार (ता. 19) ला सायंकाळी सहा वाजता ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे उन्हाळ्यात लावलेली रोपे जगविण्यासाठी तसेच पाण्याची कमतरता भासू नये यासाठी बोअर देखील घेतला आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे सुरु केले आहे. त्यामुळे ही रोपे आता चांगलीच बहरली आहेत.

यामध्ये रातरानी, वड, पिंपळ, लिंब, आंबा व त्याची सहा वाणे, जांबाच्या चार वाणांच्या रोपांचा समावेश आहे. तसेच स्वस्तिक, नारळ, खारीक, उंबर, संत्रा, मोसंबी, चिकू, कन्हेर, जांभूळ, अंजीर, गुलाब अशा जवळपास दोनशे पंचवीस रोपांचा समावेश आहे.

सदरील परसबाग तयार करण्यासाठी पंचायत समितीमधील सर्व कर्मचाऱ्यांचा लोकवाटा, यासह लोकसहभाग आहे. तसेच बागेत बसण्यासाठी मोठ्या खुर्च्या ठेवण्यात आल्या असून रात्रीच्या वेळी उजेडासाठी हायमास्ट बसविण्यात आले. सुंदर माझे कार्यालय हे अभियान हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी, डॉ. मिलींद पोहरे यांच्या मार्गदशनखाली गटविकास अधिकारी विकास अधिकारी विठ्ठल सुरवसे, सहाय्यक गट विकास अधिकारी बाबूलाल शिंदे, विस्तार अधिकारी बी.आर. गोरे, कक्ष अधिकारी श्री चिलगर, लेखापाल प्रमोद पवार, शिवाजी माने, रमेश पवार, माधव सूर्यवंशी, स्वच्छ भारत मिशनचे गट समन्वयक बी. सी. खंदारे, आर. टी. खिराडे, दादाराव आहिरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

दरम्यान कार्यालयात रंगरंगोटी करुन प्रत्येक विभागास सुविचार व सूचना फलक लावण्यात आले. दररोज कार्यालयात साफसफाई करण्याचे काम चालू आहे. प्रत्येक कार्यालयात डस्टबीन ठेवण्यात आली आहे. कार्यालयाच्या परिसरात घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

कर्मचारी व नागरिकांच्या सहकार्यामुळे शक्य

जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन तसेच पंचायत समिती अंतर्गत कर्मचारी व नागरिकांच्या सहभागातूनच कार्यालय व परिसराचा कायापालट करणे शक्य झाले आहे पुढील काळात पंचायत समितीच्या वतीने आणखी समाज जागृती उपक्रम राबविले जाणार आहेत

- विठ्ठल सुरवसे, गटविकास अधिकारी, वसमत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT