dudhna project office
dudhna project office 
मराठवाडा

सेलूतील लोअर दूधनाचे मॅनेजमेंट सबडिविझन आॅफिस आले मोडकळीस

विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : लोअर दूधना प्रकल्प धरणाचे (Lowar dudhna project) सबडिविझन आॅफिस इ. स. २०१५ साली जालना येथे गेल्यानंतर या सबडिविझन आॅफिसचे रुपांतर मॅनेजमेंट सबडिविझन आॅफिसमध्ये (Managment sub divison office)करण्यात आले आहे. त्यामुळे येथील कार्यालयासह धरणाचा कारभारच मोडकळीस आला आहे. The management subdivision office of Lower dudhna in sellu came to colaps

लोअर दूधना प्रकल्प धरणाचे सेलूत सबडिविझनचे कार्यालय गेल्या पस्तीस वर्षापुर्वी तब्बल दोन हेक्टर परिसरात उभारण्यात आले होते. कार्यालयासह अनेक कर्मचार्‍यांनाही या जागेतच निवासस्थानेही बांधुन देण्यात आली होती. तब्बल शंभर कर्मचारी याठिकाणी आपली सेवा बाजवित होते. तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्प धरणाचा व्यवहार तालुक्यातुनच होत असल्यामुळे शेतकर्‍यांसह अन्य नागरिकांना धरणासंबधी असलेले कामे सेलूतूनच होत असत.त्यामुळे सेलू तालुक्यातील नागरिकांत समाधानाचे वातावरण होते.

हेही वाचा - जिल्ह्यातील कोविड सेंटर आणि आरोग्य विभागास आपल्या स्तरावरुन सुचित करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे

केवळ राजकिय हव्यासापोटी जालना जिल्ह्यातील तत्कालीन एका कॅबिनेट मंत्र्याने इ. स. २०१५ साली सेलूतील लोअर दूधना प्रकल्प धरणाचे सबडिविझन कार्यालय जालना येथे हलविले. तसेच सेलू येथील कार्यालयाचे रुपांतर मॅनेजमेंट सबडिविझन करण्यात आले. यामध्ये सद्य: स्थितीत काॅलेटी कंट्रोल सबडिविझन, कॅनल बांधकाम सबडिविझन हे कार्यालये सुरु असून शंभर कर्मचार्‍यांपैकी केवळ दहाच कर्मचारी याठिकाणी कार्यरत आहेत. दोन हेक्टर परिसरात असलेले हे कार्यालय सद्य: स्थितीत मोडकळीस आले असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

सेलू तालुक्यातील शेतकर्‍यांना नवसंजीवनी देणार्‍या लोअर दूधना प्रकल्प धरणाचे सबडिविझन कार्यालय केवळ राजकिय हाव्यासापोटी जालना येथे हलविल्याने सेलू तालुक्यातील शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे तालुक्यातील समाजसेवी संघटना व राजकिय नेत्यांनी जालना येथे गेलेले कार्यालय पुवर्रत सेलू येथे आणण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singapore Airlines: लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद; निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक प्रथमच 52,000च्या वर, कोणते शेअर्स चमकले?

Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहचा पाय खोलात! कोर्टानं ७ विविध कलमांतर्गत केली आरोप निश्चिती

Blackout Teaser Out: "वक्त बदलने वाला है!"; '12 वी फेल' फेम विक्रांतच्या 'ब्लॅकआऊट'चा जबरदस्त टीझर रिलीज

HSC Result : पत्रकार व्हायचंय? 12वी नंतर काय कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT