tree sakal
मराठवाडा

Plants : ‘वनस्पतीस्तोत्रा’तून झाडांची माहिती ; निवृत्त प्राध्यापकाने तीन वर्षांत लिहिल्या दोन हजारांवर ओव्या

पिके, तण, वनस्पती, कीटकभक्षी वनस्पतींविषयीची माहिती मिळवण्यासाठी वनस्पतीशास्त्राची विविध पुस्तके अभ्यासावी लागतात. विद्यार्थ्यांना आणि मराठी भाषा ज्यांना ज्यांना जमते त्या प्रत्येकांना एवढेच काय श्रवणाने लिहिता वाचता न येणाऱ्यांनाही विविध वनस्पतींची माहिती मिळावी, यासाठी ही सर्व माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बॉटनी (वनस्पतिशास्त्र) विभागातून निवृत्त झालेले प्रा. डॉ. अनिल मुंगीकर यांनी ओवीबद्ध केली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पिके, तण, वनस्पती, कीटकभक्षी वनस्पतींविषयीची माहिती मिळवण्यासाठी वनस्पतीशास्त्राची विविध पुस्तके अभ्यासावी लागतात. विद्यार्थ्यांना आणि मराठी भाषा ज्यांना ज्यांना जमते त्या प्रत्येकांना एवढेच काय श्रवणाने लिहिता वाचता न येणाऱ्यांनाही विविध वनस्पतींची माहिती मिळावी, यासाठी ही सर्व माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बॉटनी (वनस्पतिशास्त्र) विभागातून निवृत्त झालेले प्रा. डॉ. अनिल मुंगीकर यांनी ओवीबद्ध केली. त्यांनी तब्बल २ हजार २०० ओव्यांमध्ये उच्चारणासाठी सोप्या पद्धतीने वनस्पतीस्तोत्र तयार केले आहे.

कुठलीही माहिती काव्यातून सांगितली, तर लवकर लक्षात राहते. त्यामुळे मुंगीकर यांनी वनस्पतीस्तोत्र लिहिले. कापूस हे नगदी पीक. या पिकाची माहिती देताना वनस्पतीस्तोत्रात डॉ. मुंगीकर म्हणतात,

कापसाचे झाड पण महत्त्वाचे

देतात वस्त्र सुती कपड्याचे।

गोसिपियम हिर्सूटम त्याला म्हणतात

मालव्हेसी कुळातून त्या येतात।

त्याच्या बियांवर तंतू पांढरे

त्यास कापूस म्हणतात बरे।।

करडई या तेलबियापासून निघणारे तेल सर्वांत उत्तम खाद्यतेल आहे. करडई पिकाचे क्षेत्र कमी होत आहे. त्याची माहिती देताना त्यांनी म्हटले आहे की,

कार्यामस टीनक्टोरस वनस्पती

तेलबिया आपणास देती।

करडई म्हणतात यास मराठीत

लागवड त्याची कोरडवाहू शेतीत।।

बोलीभाषेत त्या वनस्पतीला काय म्हणतात त्याचे बॉटनिकल नाव काय आहे ती वनस्पती कोणत्या कुळातील आहे तिचे उपयोग काय आणि कसे होतात याची माहिती यातून त्यांनी दिली. वनस्पतीची पाने, ते आपल्या पर्यावरण परिसंस्थेत पाने, फुले, फळे, खोडांच्या, मुळांच्या मदतीने काय आणि कशी भूमिका पार पाडतात याविषयीची माहिती अतिशय सोप्या भाषेत ओव्यांच्या माध्यमातून डॉ. मुंगीकर यांनी दिली.

त्यांनी सांगितले, वनस्पतीचे स्ट्रक्चर, त्यांचे स्वरूप, गुणधर्म, कार्य करण्याची पद्धत, सौर ऊर्जेचा वापर करून ते अन्न कसे तयार करतात याची लोकांना माहिती मिळावी. संशोधन करणाऱ्यांना याची मदत व्हावी यासाठी ओव्यांच्या स्वरूपात जसे सुचत गेले तसे लिहीत गेलो. यात विविध पिके, गवत, तण, विशिष्ट वनस्पती, कीटकभक्षी वनस्पती अशा अनेक वनस्पतींची माहिती अनेक संदर्भ वनस्पतीस्तोत्रामध्ये आणली आहेत. २ हजार २०० ओव्या लिहिताना कोणते पुस्तक पाहावे लागले नाही. यासाठी तीन वर्ष परिश्रम घ्यावे लागले. याचा संशोधकांना अभ्यास करणाऱ्यांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हे पुस्तकरूपाने यावे ही त्यांची अपेक्षा आहे. यातून त्यांनी सोप्या भाषेतून अवघड अशी माहिती दिली आहे. ही माहिती सर्वसामान्यांना कळणारी आहे.

जे चांगले आहे आणि ते आपल्याला माहीत आहे तर ते इतरांनाही सांगावे त्यातून आपणाला आनंद मिळतो. ज्ञान इतरांना वाटल्याने वाढते. मी ३७ वर्ष वनस्पतीशास्त्र विभागात काम केले त्या अनुभवाचा इतरांनाही फायदा झाला पाहिजे या भावनेतून अतिशय सोप्या शब्दात वनस्पतीस्तोत्र तयार करावे वाटले आणि ते तयार झाले आहे.

— डॉ. अनिल मुंगीकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''तुम्ही बंजारा समाजासारखे दिसत नसतानाही आरक्षण का खाल्लं?'', धनंजय मुंडेंना उद्देशून जरांगेंचं मोठं विधान

अडीच वर्षांपूर्वी विवाह, पतीसह सासरच्यांकडून छळ; पोलिसाच्या पत्नीनं तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन, दिरानं रुग्णालयात नेलं, पण...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Crop Loss: पिकेच झाली उद्‍ध्वस्त, खत देणार कशाला? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७० हजार टनांहून अधिक साठा पडून

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

SCROLL FOR NEXT