ST Bus sakal
मराठवाडा

बीड : संप सुरूच; लुटीवर नियंत्रण नाहीच

मनसेचा मोर्चा, बीडमध्ये बसस्थानकातून खासगी वाहतूक

सकाळ वृत्तसेवा

बीड : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागासाठी सुरु केलेला संप गुरुवारी (ता. ११) आठव्या दिवशीही सुरुच होता. बस बंद असल्याने खासगी वाहनधारकांनी दुप्पट तिकीटदर करून सुरु केलेल्या प्रवाशांच्या लुटीवर यंत्रणेने काहीही नियंत्रण आणले नाही हे विशेष.

आता बीडमध्ये बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या खासगी बस - जीप प्रवासी भरत आहेत. या ठिकाणी वाहतुकीशी संबंधित यंत्रणेचे अधिकारी असतानाही दुप्पट तिकीट दर आकारले जात असल्याने यंत्रणा नेमके करतेय काय? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गुरुवार (ता. चार) ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशीपासून संप सुरु झाला.

परिणामी जिल्ह्यातील आठही आगारांतून होणारी बससेवा ठप्प आहे. रोज १०२५ फेऱ्या रद्द होत असल्याने एक लाख ६० हजार किलोमीटर प्रवासातून बसला मिळणारे रोजचे ५५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. परिवहन महामंडळाचे कर्मचारी नियमित आंदोलन करत आहेत.

दरम्यान, बससेवा बंद असल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांनी आता प्रवाशांच्या खिशावर डल्ला सुरु केला आहे. बीड - लातूर, बीड - औरंगाबाद, बीड - पुणे, बीड - सोलापूर, बीड - जालना या लांब पल्ल्यांसाठी पूर्वीच्या तिकीट दरापेक्षा आता दुप्पट तिकीट घेतले जात आहे. एकीकडे वाहतुकीशी संबंधित यंत्रणेच्या नियंत्रणात बसस्थानकातून खासगी प्रवासी वाहतूक सुरु झाली असली तरी त्यांच्या डोळ्यादेखत अधिकचे प्रवास भाडे आकारले जात असताना यंत्रणा डोळे झाकून आहे.

दरम्यान परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढला. कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करावे, परिवहन मंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा आदी मागण्याही करण्यात आल्या. प्रदेश उपाध्यक्ष अशोक तावरे, जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, वैभव काकडे, राजेंद्र मोटे, सुमंत धस, सदाशिव बिडवे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा जगदाळे, रेखा अंबुरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव, नितीन सांगळे, जुबेर सिद्दीकी, श्रीकृष्ण गायके, अंकुश गायकवाड, आदर्श तरकसे आदींनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Padma Awards 2026: राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान; भगतसिंह कोश्यारी, दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा समावेश

Chanakya Life Guide : 'या' 2 सवयींमध्ये बदल केल्यास तुम्हाला कोणच फसवू शकणार नाही

Bullet Train: बुलेट ट्रेनच्या भुयारी मार्गाला वेग! २१ किमी बोगद्यासाठी दुसरी 'टीबीएम' घणसोलीत दाखल

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह उफाळला! शिंदे सेनेत बंडाची चाहूल; वाढत्या असंतोषामुळे नेते भाजपच्या वाटेवर?

Rain Alert: संभाजीनगरात अवकाळी वादळाचा तडाखा! पावसासह वादळी वाऱ्यांचा कहर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT