जालना ः लूटमार प्रकरणातील संशयितांकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची पाहणी करताना पोलिस अधीक्षक चैतन्य एस., अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार. सोबत पोलिस निरीक्षक यशवंत जाधव व पोलिस कर्मचारी.  
जालना ः लूटमार प्रकरणातील संशयितांकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची पाहणी करताना पोलिस अधीक्षक चैतन्य एस., अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार. सोबत पोलिस निरीक्षक यशवंत जाधव व पोलिस कर्मचारी.   
मराठवाडा

भरदिवसाच्या लुटीमागे कामगाराची टीप 

सकाळ वृत्तसेवा

जालना -  औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या मुनिमावर भरदिवसा हल्ला करून पाच लाख ८० हजार रुपये असलेली पैशांची बॅग लंपास करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना विशेष कृती दलाच्या पथकाने रविवारी (ता.२३) पकडले. त्यांच्या ताब्यातून रोख रकमेसह तीन लाख ८४ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दरम्यान याच कंपनीत काम करणाऱ्या कामगाराने एका मित्रासह सराईत गुन्हेगारांना टीप दिल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. 

शहरातील नवीन औद्योगिक वसाहतीतील दुर्गा रोलींग कंपनीचे मालक विशाल दाड बुधवारी (ता.१९) आपल्या मुनिमासोबत पाच लाख ८० हजाराची रोख रक्कम घेऊन कंपनीत पोचले होते. गाडी गेटवर उभी करून त्यांनी दाड यांनी गाडीतील जेवणाचा डबा व पैशाची बॅग मुनीम आलम पठाण यांना आणण्यास सांगितली. गाडीतून बॅग घेत असताना अचानक एका व्यक्तीने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला, त्यानंतर हल्लेखोर बॅग घेऊन फरार झाले. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही घटना गांर्भीयाने घेत पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी या प्रकरणाचा तपास विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्याकडे सोपवला होता. त्यांनी औद्योगिक वसाहतीतील सर्व सीसीटीव्ही फुटेज व रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर यशवंत जाधव यांनी कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या कामगारांची माहिती घेतली, त्यात त्यांचा दोन-तीन जणांवर संशय बळावला. त्यांपैकी संशयित अजय राधाकिसन काळे या कामगाराची चौकशी करत असताना सुरुवातीला त्याने उडवा-उडवीचे उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाकी दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मयुर बाबासाहेब खांडेराड नावाचा मित्र व त्याने कंपनीची रेकी करून सराईत गुन्हेगार सागर डिगंबर डुकरे (रा.किन्ही ता.जाफराबाद, ह.मु.शनिमंदिर परिसर, जालना) यास मालकाच्या पैशाबाबत माहिती दिली होती. त्यानुसार सागर डुकरे याने आपला साथीदार तौफीक ऊर्फ राहील आसीफ पठाण (रा.माळीपुरा, जालना) व इतर दोघांना सोबत घेऊन ही लूटमार केल्याचे समोर आले. तसेच सागर डुकरे व तौफीक ऊर्फ राहील पठाण हे दोघेही बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वे स्‍थानकावर येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना रेल्वेस्‍थानकावरून ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी गेलेल्या रक्कमेपैकी तीन लाख १० हजार ९०० रुपये, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, लोखंडी रॉड असा एकूण तीन लाख ८४ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

दरम्यान या घटनेतील दोन संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक चैतन्य एस., अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, पोलिस हेड कॉस्‍टेबल नंदु खंदारे, पोलिस कर्मचारी ज्ञानदेव नांगरे, किरण चव्हाण, विजय निकाळजे, आकाश कुरील यांनी केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

SCROLL FOR NEXT