नळदुर्ग शहरातील सराफा दुकान. 
मराठवाडा

चोरट्यांचा धुमाकूळ, सराफाची चार दुकाने फोडली

भगवंत सुरवसे

नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्रीत चार सराफा दुकानासह बांगडी विक्रेत्याचे दुकान फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. 

गुरूवारी (ता. 2) पहाटेच्या सुमारास मुख्य बाजारपेठेतील चार सराफा दुकान, तसेच एक बांगड्याचे दुकान चोरट्यांनी फोडले. सकाळी उशिरापर्यत पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. शेजारील सोन्याच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन चोरटे दिसत असले तरी त्यांनी तोंडावर कपडा बांधलेला असल्याने ओळख पटणे अवघड झाले आहे. 

चोरीचे सत्र सुरूच 
शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून चोरीचे सत्र सुरूच आहे. शहरातील भवानी चौक ते शास्त्री चौक दरम्यानची पाच दुकाने चोरट्यांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास फोडली. नागू पोतदार व शाम बागल यांचे लक्ष्मी ज्वेलर्स, सतीश मोटे यांचे जय भवानी ज्वेलर्स, वैभव शिंदे यांचे न्यू मंगल ज्वेलर्स, किरण ओवे यांचे वैष्णवी ज्वेलर्स या चार सराफांची दुकाने व ऋतुजा बॅंगल्स हे बांगडीचे दुकान चोरट्यांनी फोडले. या घटनेमुळे शहर परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. चार सराफांची दुकाने भर बाजारपेठेत फोडली. पोलिस पंचनामा झाल्यानंतरच चोरीचा निश्‍चित आकडा समोर येणार आहे. सहायक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह सकाळी आठ वाजता घटनास्थळी दाखल झाले. 

पोलिसांना दिले आव्हान 
नळदुर्ग शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या चोऱ्यांचा अद्याप तपास लागलेला नसताना चोरट्यांनी सराफांची चार दुकाने फोडून पोलिसांना आव्हान दिले आहे. श्रेया ज्वेलर्स या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे चारचाकी वाहनातून आल्याचे दिसत आहे. पहाटेच्या सुमारास या वेळी पाऊस येत होता. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वानपथक पथकाला पाचारण केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक वानखेडे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Snake Discovery: डोळे नसलेल्या सापावर संशोधन; पुण्यातील ‘तस्कर’ सापाची आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नोंद, डोळ्यांच्या जागी गुळगुळीत खवले!

Pune News: प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री! तिकिटावरील मर्यादा रद्द; विमान कंपन्यांनी दर वाढवले, काय आहेत कारणे?

Chhatrapati Sambhajinagar: चार किमी आले, उरले ३५ किलोमीटर!; दुसरा टप्पा सुरू; नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत कधी येणार?

Chhatrapati Sambhajinagar: थकबाकीमुळे ८१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Chhatrapati Sambhajinagar: आठवडाभरात मिळणार शिधापत्रिकेवर केरोसीन; कंपन्यांकडून तालुकानिहाय होणार वाटप

SCROLL FOR NEXT