bhaji 
मराठवाडा

घरखर्चासाठी भाजी विकण्याची अशीही धडपड... 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड ः एरव्ही कुठेही भाजीपाला घेऊन बसल्यास हाताशी उरेल इतका व्यवसाय होत होता. मात्र, लॉकडाउन आणि ‘कोरोना’च्या धास्तीने सर्व व्यवसायांवर संकट निर्माण झाले आहे. अशा स्थितीत सर्वाधिक फटका बसलाय तो शेतकरी आणि भाजीपाल उत्पादकांना. असाच एका शेतकऱ्याची घरातील सदस्यांसाठी दररोजच्या चटणी-भाकरीची सोय व्हावी, यासाठी तळपत्या उन्हात आणि निर्मनुष्य ठिकाणी एखादे ग्राहक येईल आणि ते काहीतरी खरेदी करेल यासाठी धडपड सुरू आहे.       

नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांनी संकटात येणाऱ्या शेतकऱ्यांना ‘कोरोना’च्या धास्तीने सुरू असलेल्या लॉकडाउनने चांगलेच अडचणीत आणले आहे. शहरासह खेडेगावांतही संचारबंदी असल्याने तसेच बाजारपेठांही बंद असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकविलेला भाजीपाला, फळे विकणे कठीण झाले असून ते जागेवरच सडून जात असल्याचे चित्र आहे.

अतिवृष्टीत लॉकडाउनची भर 
कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, महापूर, तर कधी कोरड्या दुष्काळाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. यातच आता नव्याने उमगलेल्या कोरोना आजाराने त्यात भर घालली आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून एकमेकांच्या संपर्कात आल्याने यामध्ये वाढ झपाट्याने होते. त्यामुळे शासनाने देशासह संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाउन केले असून कोणीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. 

निर्बंधामुळे भाजीपाल्याची वाहतूकही बंद
संचारबंदीमुळे संपूर्ण ठिकाणांवरील आठवडे बाजार तसेच सर्व भाजीपाला लिलाव बंद झाले आहेत. तसेच वाहनांवरही निर्बंध आणल्यामुळे भाजीपाल्याची वाहतूकही बंद झाली आहे. ग्राहकांअभावी होलसेल व्यापारीही  भाजीपाला घेण्यास धजावत नाहीत. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा भाजीपाला जागेवरच सडून जात असल्याचे चित्र आहे. तर काही शेतकरी भाजीपाला घेऊन आपल्या शेतालगतच्या लहान - मोठ्या निर्मनुष्य रस्त्यावर कोणीतरी ग्राहक येईल व साखर - पत्तीपुरते तरी पैसे मिळतील या आशेने बसत आहेत. 

साखर-पत्तीपुरते तरी पैसे मिळण्याची आशा
नांदेड - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर वाका (ता.लोहा) येथील शेतकरी माधव परसराम भरकडे निर्मनुष्य ठिकाणी वांगे व भेंडी विकण्यासाठी बसले होते. या बाबत ते म्हणाले, या वर्षी झालेल्या अतिपावसाने खरिपातील पीक वाया गेले. शेतात तण जास्त झाल्याने तसेच मजुरी वाढल्याने रब्बीसाठी शेत तयार करण्यासाठीही अडचणी आल्या. घरखर्च भागेल या आशेने थोड्या जमिनीत कांदे, वांगे, भेंडी, लसणाची लागवड केली. आता भेंडी आणि वांगे लागण्यास सुरवात झाली आहे. मात्र, संचारबंदीमुळे बाजारपेठा बंद आहेत. आता हा भाजीपाला जनावरांना टाकण्याची वेळ येत आहे. लागवडीचा खर्च तर गेला; पण आता साखर - पत्तीपुरते तरी पैसे मिळतील या आशेने रस्त्यावर माळव घेऊन बसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT