File Photo 
मराठवाडा

‘या’ कर्मचाऱ्यांनाही हवेय ५० लाखाचे विमा कवच, कोणाला ते वाचा...

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : ‘कोरोना’चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर, पोलिस, ग्रामसेवक, मदतनीस, संगणक परिचालक, आशा वर्कर्स अशा विविध विभागात कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांना ९० दिवसांकरीता ५० लाख रुपयाचे विमा संरक्षण दिले आहे. त्याच धर्तीवर बँकेतील कर्मचाऱ्यांना देखील कोरोना काळात ५० लाख रुपयांचे विमा सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी सहकारी बँक बहुजन कर्मचारी संघटना (महाराष्ट्र राज्य) यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे. 

बँक बहुजन कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भास्कर इंगळे शुक्रवारी (ता.१८) एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांनी ही मागणी केली आहे. संघटनेच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना आणि देशात लॉकडाउनची स्थिती असताना देखील बँक कर्मचारी शासनाच्या आदेशाप्रमाणे कर्तव्य पार पाडत आहेत. परंतु, ही सेवा देत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात अनेक व्यक्ती येतात. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस कोरोनाची लागण आहे किंवा नाही हे ओळखणे शक्य नाही. 

आम्हाला कोरोना झाला तर कुटुंबियांचे काय?
संकट काळात देखील ग्राहकांना सेवा देत असलेल्या बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षा काय असा सवाल कर्मचारी वर्गातून उपस्थित केला जात आहे. बँकेत येणाऱ्या ग्राहकांकडून देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा म्हणून त्यांनादेखील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सुरक्षा कवच म्हणून ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जावे, अशी मागणी बँक बहुजन कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भास्कर इंगळे, श्रीमती पद्मश्री गायकवाड, अभिषेक गुरावा यांनी केली आहे. भास्कर इंगळे यांनी केलेली मागणी रास्त असली तरी, त्यांच्या मागणीला शासन दरबारी कितपत यश येते हे बघणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Latest News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची तुरुंगात हत्या? ; भेटायला गेलेल्या बहिणींना झाली मारहाण!

Stock Market Today : शेअर बाजार रेकॉर्डच्या उंबरठ्यावर, सेन्सेक्स 1000 अंकांनी वाढला; कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील महिलेने केला पुरुषावर अत्याचार

एकदम झापूक झूपूक स्टाइल! सुरज चव्हाणचं लग्नाआधी कडक प्री- वेडींग; फोटो पाहिलेत का?

Navi Mumbai News: विमानतळाला ३ नवे उड्डाणपूल जोडणार, ठाणे–बेलापूर रस्ता नव्या रुपात झळकणार; नवीन मार्ग कसे असणार?

SCROLL FOR NEXT