फडा विक्री करण्यासाठी आलेल्या कारागीर. 
मराठवाडा

ही वस्तू उरली सणापुरतीच ! 

दिलीप मोरे

देवगावफाटा (जि.परभणी) : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या मोठ्या सणासाठी किंवा लग्नसमारंभ या शुभप्रसंगी घरामध्ये सर्वप्रथम ‘फडा’ खरेदी करण्याची जुनी प्रथा आहे. मात्र, लक्ष्मीचा मान लाभलेला ‘फडा’ आता ग्रामीण भागातील गावात सणावारांपुरताच मर्यादित राहिला असून फड्यासाठी लागणाऱ्या शिंदीच्या झाडांची त्या दृष्टीने उपयोगिताही संपली आहे.

सेलू तालुक्यातील देवाला पुनर्वसन येथे काही कुटुंब शिंदीच्या झाडांच्या पनाळ्यांपासून फडा तयार करून तो ग्रामीण भागात विक्री करतात. ग्रामीण भागांमध्ये फड्याला बाराही महिने मागणी असल्यामुळे हा व्यवसाय वर्षभर चालणारा व्यवसाय आहे. दररोज भल्या पहाटे उठून रानावनात, जंगलात फिरून पनाळ्या तोडून आणाव्या लागतात व त्या पनाळ्या वाळवून त्यापासून हे कुटुंब फडे तयार करतात. अशा या फडा तयार करण्याच्या प्रक्रियेला किमान तीन ते चार दिवस लागतात. त्यात दिवसेंदिवस अवैधरीत्या होत असलेल्या वृक्षतोडीमुळे यात हे शिंदीवृक्ष नष्ट होत चालले आहेत. दूरपर्यंत जाऊन, दिवसभर भटकंती करूनही काळाच्या ओघात हे वृक्ष दुर्मिळ होत चालल्यामुळे आता फडा तयार करण्यासाठी बाहेरील राज्यातून शिंदीच्या पनाळ्या विकत घ्याव्या लागत आहेत. परंतु, त्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ लागल्याने अनेक कारागिरांनी त्यामुळे त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय हद्दपारच केला आहे.

हेही वाचा :​  ९५ वर्षांचा ‘तरुण’ देतोय व्यायामाचे धडे !

लक्ष्मीचा मान म्हणून मागणी......
हल्ली इलेक्ट्रिकल वस्तूंनी अनेक जुन्या वस्तूंची जागा घेतली आहे. त्यामुळे ही साधने तयार करणाऱ्या कारागीर समूहावर उपासमार सुरू झाली. मात्र, आजही महाराष्ट्रीय संस्कृतीत प्रत्येकांच्या घरात फड्याला लक्ष्मी मानली जाते, तर लग्न समारंभात व सणावारांत विशेष मान आहे. त्यासाठी का होईना लक्ष्मीचा मान म्हणून फड्याला मागणी आहे.

गृहणींचे काम अधिक सोपे
फडे तयार करून त्याची विक्री करणे हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. परंतु, टाईल्स आणि फरशीच्या घरात फड्यांची जागा आता स्टाईलिश झाडूंनी घेतल्यामुळे एकीकडे गृहणींचे काम अधिक सोपे झाले असले तरी, आमच्यासारख्या सर्वसामान्यांचा व्यवसाय मात्र हद्दपार होत चालला आहे.
- रंगूबाई तुकाराम कांबळे
देवला पुनर्वसन, (ता.सेलू) फडा विक्रेता कारागीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

14 व्या वर्षी लग्न, सासरी सहन केला नाहक त्रास, 450 सिनेमांमध्ये काम करुनही झाला दुर्देवी अंत, कोण होती अभिनेत्री?

Gulabjam City: जिभेवर ठेवताच विरघळणारा 'शाही' गोडवा! 'या' शहराला म्हणतात 'गुलाबजामची राजधानी'; ८५ वर्षांपासून जपलीये चव!

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे संतप्त; ‘फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा हवी’

SCROLL FOR NEXT