Nanded Photo
Nanded Photo 
मराठवाडा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी या दोन बँकांनी केली इतक्या लाखाची मदत

शिवचरण वावळे

नांदेड : देशात कोरोना वायरसमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. देशातील आर्थिक व्यवहार बंद पडली आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारला कोरोनाविरुद्ध लढ्याकरीता आर्थिक मदत म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक आणि नांदेड मर्चंन्ट को. आॅप. बँकेनी मिळुन 
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २६ लाखापेक्षा अधिकची आर्थिक मदत केली. या शिवाय नांदेड मंर्चंट'बँकेच्या वतीने अन्नधान्य किट साठी दोन लाखाची मदत केली आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुनील कदम व नांदेड मंर्चंट'बँकेचे अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी सोमवारी (ता.१३ एप्रिल २०२०) हा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडे सुपूर्द केला. कोरोना वायरसमुळे राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आवाहनाला प्रतिसाद देत ‘नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके’कडून ११ लाख व बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून एका दिवसाचा पगार, अशी एकत्रित १५ लाख १२ हजार ५०० रुपये निधी तर नांदेड मर्चंट कडून ११ लाख आणि दोन लाख अशी दोन्ही बँकांनी मिळुन २८ लाख १२ हजार ५०० रुपये इतकी एकत्रित मदत दिली आहे. यावेळी  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम, मर्चंट'बँकेचे संचालक गोवर्धन बियानी यांची उपस्थिती होती.   

हेही वाचा- Video : तीन दिवसाच्या सुट्टीनंतर बॅंकांत उसळली ग्राहकांची गर्दी 
बुधवारपासून जिल्हा बँकेचे आर्थिक व्यवहार सुरू

करोना व्हायरसमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आर्थिक व्यवहार बंद करण्यात आले होते. परंतु, यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आर्थिक व्यवहार बुधवारपासून (ता. १५) पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी दिली.

दिवसातून केवळ शंभर खातेधारकांना पैसे मिळणार
तकऱ्यांची होणारी आर्थिक अडचण विचारात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सोमवारी (ता. १३) बुधवारपासून बँकेचे व्यवहार पूर्ववत करण्यासाठी आदेश जारी केला आहे. बँक सुरू दरम्यान खबरदारी घेऊन टोकन पद्धत व स्वयंसेवी स्वयंसेवकांची मदत घेऊन सोशल डिस्टन्स ठेवून नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखेमध्ये ता. १५ एप्रिलपासून शासकीय अनुदान, पीकविमा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलांची रक्कम वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी केवळ शंभर खातेदारांना वाटप करण्यात येणार आहे.

हेही वाचा-  एका पत्राने शेतकऱ्यांची चिंता मिटली, कुठे आणि कशी ते वाचा...
सोशल डिस्टन्सची खबरदारी घेणे बंधनकारक

बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकास सामाजिक अंतर राखून व तोंडावर मास किंवा रुमाल वापरून सर्व शेतकरी व ग्राहकांनी एक मीटर अंतर ठेवून रांगेत उभे राहून एका- एकाने पेमेंट करण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी ज्यांना रक्कम दिली जाईल, अशा खातेदारांची यादी एक दिवस संबंधित गावच्या ग्रामपंचायत अथवा सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  

बँकेला सहकार्य करा

ग्राराहकांनी ठरवून दिलेल्या वेळेमध्ये शाखेत उपस्थित राहून पेमेंट घ्यावे. सर्व खातेदारांनी सुरक्षित अंतर ठेवून बँकेमध्ये आर्थिक व्यवहार करावे. सामाजिक अंतर राखावे, अन्यथा नाईलाजास्तव बँकेतील आर्थिक व्यवहार बंद करावे लागतील, अशी वेळ येऊ देऊ नका. शिस्तीत बँकेतील व्यवहारचा लाभ घ्या आणि बँकेला सहकार्य करा. 
अध्यक्ष डॉ. सुनील कदम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT