file photo 
मराठवाडा

गावाकडे परतण्यासाठी वडील गेल्याचा रचला बेबनाव

कृष्णा पिंगळे

सोनपेठ (जि.परभणी) : वडील वारले आहेत, असे खोटे सांगून पुण्यातून शिर्शी (ता. सोनपेठ) येथे आलेल्या तिघांना सोनपेठ पोलिसांनी सोमवारी (ता. १३) ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांची तपासणी करून त्यांना इन्स्ट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे.

शिर्शी (ता. सोनपेठ, जि. परभणी) येथील रहिवाशी आकाश वैजनाथ रणदिवे, वैजनाथ इंदुबा रनदिवे व रेखा वैजनाथ रणदिवे हे तिघे पुणे येथे वास्तव्यास होते. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या सीमादेखील बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात कुणालाही प्रवेश दिल्या जात नाही. परंतु, पुणे येथे वास्तव्यास असणारे आकाश वैजनाथ रणदिवे, वैजनाथ इंदुबा रनदिवे व रेखा वैजनाथ रणदिवे यांनी त्यांचे वडील वारले असल्याची खोटी माहिती सांगून एका कारमधून चाकन (जि. पुणे) येथून परभणी जिल्ह्यात आले.

हेहीवाचा...

तिघांना केले क्वारंटाइन
 परंतु, डिघोळ (ता. सोनपेठ) येथे आल्यानंतर तेथे असलेल्या चेक पोस्टवर त्यांची तपासणी केली असता पोलिसांनी त्यांची अधिक माहिती घेतली. परंतु, ही माहिती खोटी असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्या तिघांची ही वैद्यकीय तपासणी करून त्यांना इन्स्ट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे.

गावठी दारू विक्रेत्यावर कारवाई
सोनपेठ (जि.परभणी) :
लॉकडाऊनमुळे तळीरामांना दारू मिळत नसल्याने त्यांनी आपला मोर्चा आता गावठी दारूकडे वळविला आहे. सोनपेठ पोलिसांनी या गावठी दारू उत्पादक व विक्रेत्यांवर मोठी कारवाई करून त्यांना अटक केली आहे.
पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना गुप्त माहिती मिळताच त्यांनी ता. १२ व ता. १३ रोजी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी यांच्या पथकाने करम तांडा, नैकोटा, नरवाडी, उखळी आदी ठिकाणी छापे मारून अवैधरीत्या गावठी दारू तयार करण्यासाठी केलेले दोनशे लिटर रसायन व ८७ लिटर गावठी दारू पकडली. हे रसायन पोलिसांनी नष्ट केले. तसेच ८७ लिटर गावठी दारू जप्त केली. या कारवाईत राजेभाऊ राठोड, राम राठोड (रा. करम तांडा), लक्ष्मी मुद्दल (रा. करम), सुनील राठोड, वैजनाथ जाधव (रा. नैकोटा), विजय पंचांगे (रा. उखळी) व राजेश कुकाने (रा. नरवाडी) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- बँकांबाहेरील गर्दी हटता हटेना

हेही वाचा...

खोटी बातमी देणाऱ्या पत्रकारावर गुन्हा
परभणी :
कोरोना विषाणूसंदर्भात चुकीची बातमी पसरविणाऱ्या पूर्णा येथील एका पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्णा येथील एका दैनिकाच्या पत्रकाराने कोरोना विषाणूसंदर्भात एक खोटी बातमी पसरविली. याची दखल घेत पूर्णेचे नायब तहसीलदार चंद्रकांत बिजमवार यांनी ता. १३ एप्रिल रोजी पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पूर्णा पोलिस ठाण्यात सदरील पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

Latest Marathi News Update : कुख्यात गुंड मंगेश मडावी पोलिसांच्या जाळ्यात,सुजातपूरमधून अटक, ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

Nagpur Crime : ‘एआय’ तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT