Chakur Crime News 
मराठवाडा

कारचा अपघात झाल्याने सापडले चोरटे, लातूर जिल्ह्यातील घटना

रविंद्र भताने

चापोली (जि.लातूर) : चाकूर येथील एटीएममधून विठ्ठल सूर्यवंशी यांनी पैसे काढले. चोरट्यांनी त्यांचे पैसे व एटीएम कार्ड हिसकावले व कारने पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. आनंदवाडी शिवारात कारचा अपघात झाल्यामुळे शुक्रवारी (ता.21) रात्री दोन चोरांना पकडण्यात यश आले. एक चोरटा फरारी आहे.
सूर्यवंशी हे पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर चोरांनी पाळत ठेवली होती.

पैसे काढून बाहेर येताच चोरट्यांनी सूर्यवंशी यांच्या हातातील एटीएम कार्ड व पाचशे रुपये हिसकावले व कारने (एचआर २१ एम ३०२१) चापोलीकडे पळ काढला. चापोली येथील पोलिस पाटील सिराज देशमुख यांना पोलिसांनी फोन करून संबंधित कारकडे लक्ष ठेवायला सांगितले. मात्र चोरट्यांनी भरधाव कार आनंदवाडीकडे वळवली. सिराज देशमुख व काही तरुणांनी कारचा पाठलाग केला. आनंदवाडी शिवारात कार उलटून शेतात पडली. त्यात कारचा चुराडा झाला. कारमधील तिघेही किरकोळ जखमी झाले, तरीही त्यांनी पळ काढला. काही क्षणांतच पोलिस घटनास्थळी आले. योगिंदर चंदरसिंग पट्टी (रा. शैमान, ता. नारनुंद, हरियाना) व राजेश बलूराम ऊर्फ इलूराम सिंग (रा. हसी, हरियाना) या संशयितांना पाठलाग करून पकडले. तिसरा संशयित फरारी झाला. पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक डॉ. बी. एन. तोटेवाड, उपनिरीक्षक त्र्यंबक गायकवाड उपस्थित होते. विठ्ठल सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली.


कार काठड्यावर आदळून दोघांचा मृत्यू
अहमदपूर ः पुलाच्या कठड्यावर कार आदळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. २२) पहाटे घडली. किनगाव येथून शुक्रवारी (ता. २१) रात्री राजाराम मारुती डिगोळे (वय ५०), सिकंदर गौस शेख (२६), उत्तम देवदे (२२), माधव देवदे (२०) व अन्य एक असे पाचजण संध्याकाळी कारने (एमएच- १६, सीसी- ०३६९) देवदर्शन करण्यासाठी निघाले. देवदर्शन आटोपून पाचजण परतताना शनिवारी (ता. २२) पहाटे अहमदपूर (जि.लातूर) शहरापासून चौदा किलोमीटर अंतरावर असलेल्या काजळहिप्परगाजवळील पुलाच्या कठड्याला कार धडकली. यात राजाराम डिगोळे, सिकंदर गौस शेख यांचा मृत्यू, तर उत्तम देवदे, माधव देवदे व अन्य एक हे तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अहमदपूरपासून अंबाजोगाईकडे जाणारा काँक्रिट रस्ता नव्याने झाला आहे. या रस्त्यावर वाहनांचा वेग जास्त असतो. या कारणामुळे या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गौरी-गणपतीत सोन्याच्या भावात मोठी उलथापालट! 2 दिवसांत ₹30 हजार... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात ताजा भाव काय?

Mumbai Local Megablock: गणेशोत्सवात मेगाब्लॉकचे विघ्न नाही, प्रवाशांना दिलासा; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

iPhoneचा भंडारा! Apple फोनचे मोफत वाटप, २२ सप्टेंबरला आयोजन; कुठे आणि कोण देणार? पाहा VIDEO

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

Chhatrapati Sambhajinagar Accident News: दुचाकीला कट लागल्याने रस्त्यावर कोसळला तरुण; मागून आलेल्या सिमेंट मिक्सरखाली आल्याने जागीच प्राण गमावले

SCROLL FOR NEXT