Osmanabad News 
मराठवाडा

तोंडाला कपडा बांधून चोरट्यांनी घातला असा धुमाकूळ, की... 

सकाळ वृत्तसेवा

नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्रीत चार सराफांची व बांगडी विक्रेत्याचे असे पाच दुकाने फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर पुन्हा आव्हान उभे केले. गुरूवारी (ता. २) पहाटेच्या सुमारास मुख्य बाजारपेठेतील चार सराफा व एक बांगड्याचे दुकान चोरट्यांनी फोडले. 

सकाळी उशिरापर्यत पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. शेजारील सोन्याच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन चोरटे दिसत असले तरी त्यांनी तोंडावर कपडा झाकलेला होता.

शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून चोरीचे सत्र सुरूच आहे. शहरातील भवानी चौक ते शास्त्री चौक दरम्यानची पाच दुकाने चोरट्यांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास फोडली. नागू पोतदार व शाम बागल यांचे लक्ष्मी ज्वेलर्स, सतीश मोटे यांचे जय भवानी ज्वेलर्स, वैभव शिंदे यांचे न्यू मंगल ज्वेलर्स, किरण ओवे यांचे वैष्णवी ज्वेलर्स या चार सराफांची दुकाने व ऋतुजा बँगल्स हे बांगडीचे दुकान चोरट्यांनी फोडले. 

या घटनेमुळे शहर व परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. चार सराफांची दुकाने भर बाजारपेठेत फोडली. पोलिस पंचनामा झाल्यानंतरच चोरीचा निश्चित आकडा समोर येणार आहे. सहायक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह सकाळी आठ वाजता घटनास्थळी दाखल झाले.

नळदुर्ग शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या चोऱ्यांचा अद्याप तपास लागलेला नसताना चोरांनी सराफांची दुकाने फोडून पोलिसांना आव्हान दिले आहे. श्रेया ज्वेलर्स या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे चारचाकी गाडी घेऊन आल्याचे दिसत आहे. पहाटेच्या सुमारास यावेळी पाऊस येत होता. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वानपथक बोलावल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक वानखेडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: शरद पवार करणार दुष्काळाची पाहणी; राज्यात २८ सप्टेंबरपासून दौरा; शेतकऱ्यांशी थेट संवाद

Bangladesh MP Arrested : ७५ वर्षीय खासदाराच्या १९ वर्षीय पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; घटनास्थळी चिठ्ठी सापडली अन्, खासदाराला पोलिसांकडून अटक

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

SCROLL FOR NEXT